जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:36 PM2021-09-24T21:36:02+5:302021-09-24T21:39:17+5:30

UPSC Exam Result: जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली असून ३३८ वा रँक प्राप्त केला आहे. शुक्रवारी (दि.२४) युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

Collector Nayana Gunde's daughter Divya passes UPSC exam | जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण  

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण  

googlenewsNext

गोंदिया : जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली असून ३३८ वा रँक प्राप्त केला आहे. शुक्रवारी (दि.२४) युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

दिव्या गुंडे हिने ऑक्टोबर २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगची परीक्षा दिली. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२१ रोजी दिल्ली येथे त्यांची मुलाखत घेऊन शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केले. येत्या काही दिवसातच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत पदस्थापना मिळणार आहे. प्रशासकीय स्तरावर हे वृत्त कळताच अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिव्या गुंडे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट उपविभागीय, तहसीलदार आदेश डफड, अपर तहसीलदार अनिल खळतकर, मुख्याधिकारी न.प.करण चव्हाण,आकाश चव्हाण, किशोर राठोड व अधिकारी उपस्थित होते.

यशाचे श्रेय आईला
दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे श्रेय आई जिल्हाधिकारी नयना गुंडे व बाबा अर्जुन गुंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक यांना दिले आहे. या यशात शिक्षक व मार्गदर्शक यांच्या मोलाच्या वाटा असल्याचे दिव्याने सांगितले. युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियातर्फे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिव्या व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Collector Nayana Gunde's daughter Divya passes UPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.