माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 03:17 PM2019-12-18T15:17:01+5:302019-12-18T15:17:06+5:30

हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

Citizen Amendment Bill Against My Caste: Jitendra Awhad | माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

googlenewsNext

नागपूर: नागपूरात आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा घटनाबाह्य असल्याचे सांगत या कायद्या विरोध केला. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करु नये अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा कायदा माझ्या जातीविरुद्ध असल्याचे सांगितले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझी जात वंजारी आहे व नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझ्या जातीमधील 50 टक्के लोकं शेतमजुरी करतात. शेतमजुरी करत असताना शेतामध्येच त्यांचे बाळांपण होतं. त्यामुळे त्यांच्याकडे दाखले नाहीत. त्यामुळे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसल्याने ते नागरिकत्व कोणत्या आधारे सिद्ध करणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

भारतामध्ये माझ्या जातीसारख्या सहा हजार जाती आहेत की ज्यांच्याकडे घर किंवा दाखले नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे ही लढाई गरीब जनता आणि श्रीमंत जनता अशी आहे. ही लढाई मलबार हिलमध्ये राहणारा माणूस आणि गडचिरोलीत राहणाऱ्या माणासांशी असून हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतातील राज्यांत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात पसरले असून, त्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात कँटिन, वाचनालय व वर्गात शिरून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हैदराबाद, तामिळनाडू, लखनऊ, बंगळुरू, चेन्नई, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काल जोरदार निदर्शने करण्यात आली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात कोलकातामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

Web Title: Citizen Amendment Bill Against My Caste: Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.