चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 07:14 PM2020-11-23T19:14:42+5:302020-11-23T19:24:50+5:30

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिसवाल केला होता.

Chandrakant Patil's name short form is 'he' .. so he should not be angry: Jayant Patil stroke | चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

Next

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर होते. मात्र त्यानंतर पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मला तसे म्हणायचे नव्हते. मी फक्त कायदेशीर बाबींचा संदर्भ घेऊन बोलत होतो अशी सारवासारव करतानाच अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. तसेच देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात टीकाकारांना प्रतिसवाल केला होता. मात्र या प्रश्नाला उत्तर देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. 

पुणे पदवीधर निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे प्रश्नच निर्माण करतात. कारण चंद्रकांत पाटलांसाठी भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभा मतदार संघाचे तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर तिथे पाटील आमदार झाले. त्यामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून पदवीधर निवडणुकीसाठी आपला विचार होईल अशी अपेक्षा होती. मात्र भाजपने पदवीधर निवडणुकीत देखील त्यांना तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले? हे माझ्यापॆक्षा मेधा कुलकर्णीच चांगल्या प्रकारे सांगतील अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला. 

आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये, अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला.
 
चंद्रकांत पाटलांनी पुणेकरांनी मोठ्या मनाने स्वीकारले. मात्र पदवीधरच्या असो वा पुणे कोथरूड मतदार संघ ते ज्या ज्या वेळी निवडून आले. त्या भागाच्या विकासासाठी त्यांनी किती प्रयत्न केले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेल्या पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी आत्तापर्यंत कितपत पुढाकार घेतला आहे. हाही एक प्रश्नच आहे असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. 

Web Title: Chandrakant Patil's name short form is 'he' .. so he should not be angry: Jayant Patil stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.