खैरेंचंं ठरलं; 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:16 PM2019-08-11T14:16:32+5:302019-08-11T15:13:36+5:30

खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

chandrakant khaire contest maharashtra vidhansabha election | खैरेंचंं ठरलं; 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार ?

खैरेंचंं ठरलं; 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार ?

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या शिवसेनेचे नेत आणि माजी खासदार चंद्रकात खैरे आता विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी वैजापूर मतदारसंघात दौरे सुद्धा सुरु केल्याची चर्चा पहायला मिळत आहे. शिवसेनेचे माजी आमदार आर.एम. वाणी यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केल्याने मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने चंद्रकात खैरे वैजापूरमधून आपले नशीब आजमवणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत सलग चार वेळा खासदार राहिलेल्या खैरेंना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांनतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरु झाली. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाहीत. त्यामुळे खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि सद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या वैजापूर मतदारसंघातून खैरे चाचपणी करत आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या मतदारसंघात दौरे सुद्धा वाढले आहे.

वैजापूर मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक करणारे माजी आमदार वाणी यांचा गेल्यावेळी राष्टवादीचे विद्यामान आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पराभव केला होता. तर आगामी निवडणुकीत प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचे वाणी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सेनेला येथून सक्षम असा उमेदवार मिळत नाही. त्यात लोकसभा निवडणुकीत सेनेला या मतदारसंघातून १० हजाराचे मताधिक्य मिळाल्याने, सेनेसाठी ही जागा महत्त्वाची समजली जाते .

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मिळाले मताधिक्य आणि तालुक्यातील सेनेची ताकद लक्षात घेत, खैरे वैजापूरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या गटात सुरु आहे . त्यामुळे त्यांनी मतदारसंघात दौरे सुद्धा सुरु केले आहेत. लोकसभा निवडणुकीत खैरे यांना वैजापूर येथून ६६ हजार ६७१ मते मिळाली होती. तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ५५ हजार ५५४ मते मिळाली. मात्र आता विधानसभा निवडणुकीत जाधव नसणार, त्यामुळे मराठा समाजाची मते सेनेला मिळू शकते असा अंदाज सेनेकडून बांधला जात आहे. मात्र अखेर खैरे हे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: chandrakant khaire contest maharashtra vidhansabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.