‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:27 AM2020-08-14T03:27:41+5:302020-08-14T03:27:54+5:30

आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बारावी गुणांवरच प्रवेश दिला जाण्याचे संके

CET decision is still pending | ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; उदय सामंत यांची माहिती

‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; उदय सामंत यांची माहिती

Next

पुणे : राज्यात एमएचटी-सीईटी देणारे साडे पाचलाख विद्यार्थी आहेत. त्यांची परीक्षा घ्यायची असल्यास जिल्हा, तालुका स्तरावर त्यांना आणू शकतो का, त्याठिकाणची यंत्रणा, शारीरिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करणे अशा काही मुद्यांवर सीईटी सेल आयुक्तांकडून सर्वेक्षण केले जात आहे. पुढील सात-आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी स्पष्ट केले. तसेच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बारावी गुणांवरच प्रवेश दिला जाण्याचे संकेत सामंत यांनी दिले.

सामंत यांनी गुरूवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. काही संस्थांच्या शाळा, वसतिगृहात क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी परीक्षांसाठी संगणक व इतर यंत्रणा सक्षम आहे की नाही, याची पडताळणी केली जात आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
अनेक विद्यार्थी बारावीऐवजी सीईटीसाठी चांगला अभ्यास करतात. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय होईल,’ असेहीे सामंत यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभुमीवर तृतीय वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. शुक्रवारी त्यावर निकाल येणे, अपेक्षित आहे. यावर सामंत म्हणाले, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यानुसार भुमिका घेतली जाईल.

निर्णय चर्चेनंतरच
मंत्री झाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक निर्णय घेताना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली आहे. मागील पाच वर्षात जेवढी चर्चा कुलगुरूंशी झाली नसेल, तेवढ्या बैठका, चर्चा मी मंत्री झाल्यावर केली आहे, असा टोलाही सामंत यांनी लगावला.

Web Title: CET decision is still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.