CBSE 10th Result 2019: सीबीएसई दहावीचा टक्का वाढला; चौघांना ५०० पैकी ४९७ गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:48 AM2019-05-07T07:48:33+5:302019-05-07T07:48:58+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

 CBSE scores 10%; Four out of 500 have 497 marks | CBSE 10th Result 2019: सीबीएसई दहावीचा टक्का वाढला; चौघांना ५०० पैकी ४९७ गुण

CBSE 10th Result 2019: सीबीएसई दहावीचा टक्का वाढला; चौघांना ५०० पैकी ४९७ गुण

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई/नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले आहेत. नवी मुंबईतील एपीजे स्कूलची दीपस्ना पांडा, ठाणे येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलची धात्री कौशल मेहता, न्यू हॉरीझन स्कॉलर्स स्कूलचा अ‍ॅड्री दास आणि नागपूरची आर्या डाऊ यांचा त्यामध्ये समावेश आहे. देशभरातील निकाल ९१.१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सीबीएसई दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिलदरम्यान झाली. देशभरातून १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ लाख ४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील १३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण घेऊन संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पुण्याचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाने ९९ टक्के अशा विक्रमी निकालाची नोंद केली. ९० पेक्षा जास्त टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे.
नवी मुंबईतील ऋजुता कुलकर्णी, प्रांजल गोयल, मुंबईतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि प्रणिता राव या पाच जणांना ५०० पैकी ४९५ गुण मिळाले.
आर्या डाऊ विदर्भात टॉप
नागपुरच्या आर्या डाऊ हिने ९९.४० टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल तर, देशात तृतीय स्थान पटकावले. ती भारतीय कृष्ण विहार शाळेची विद्यार्थिनी आहे. याशिवाय विदर्भामध्ये सेंटर पॉर्इंट स्कूल अमरावती बायपास शाखेच्या राघवी शुक्लाने ९९ टक्के गुण मिळवले.
दीपस्ना पांडाला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. ती म्हणाली, मी शाळेत पहिली येईन असे ध्येय बाळगले होते. त्यासाठी वेळापत्रक आखून त्याप्रमाणे दररोज ४ तास काटेकोर अभ्यास केला. धातरी कौशल मेहता या टॉपरला इंजिनिअर बनायचे आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईत प्रवेश घेण्याची तिची इच्छा आहे. धातरीला गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, संस्कृत या विषयांत प्रत्येकी १०० गुण व इंग्रजीमध्ये ९७ गुण मिळाले आहेत.
आयएएस होण्याचे आयुषीचे स्वप्न
गोव्यातील टॉपर आयुषी साहूू हिला आयएएस बनायचे आहे. तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. आयुषीने अभ्यासाचा मनावर कधी ताण पडू दिला नाही. शाळव्यतिरिक्त घरीही ती रोज दोन ते तीन तास अभ्यास करत असे. तिला गणितात १००, सामाजिक विज्ञानात ९९, विज्ञानामध्ये ९८, हिंदीमध्ये ९८ गुण मिळाले आहेत.
इराणी यांच्या मुलीला ८२ टक्के
केंद्रीय मंत्री व अमेठी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृति इराणी यांची मुलगी झोईश हिला सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले आहेत. नुकताच १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. त्यात इराणी यांचा मुलगा झोहरला ९१ टक्के गुण मिळाले होते.

Web Title:  CBSE scores 10%; Four out of 500 have 497 marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.