...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:48 PM2020-01-08T14:48:16+5:302020-01-08T14:48:20+5:30

कोरेगाव-भीमा प्रकरणावर गृहमंत्र्यांचं भाष्य

cant say anyone urban naxal just because he criticized previous government says home minister anil deshmukh on bhima koregaon | ...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री

...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री

googlenewsNext

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मी लवकरच बैठक घेईन आणि विस्तृत आढावा घेऊनच सरकारची भूमिका मांडेन. आधीच्या सरकारच्या भूमिकेविरुद्ध वेगळी मतं मांडली म्हणून कोणाला शहरी नक्षलवादी म्हणणं योग्य ठरणार नाही असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मांडलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

कोरेगाव-भीमा प्रकरणात शहरी नक्षलवाद्यांचा सहभाग होता का याची अन्य मुद्द्यांप्रमाणे चौकशी सुरू आहे. चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येईल असे देशमुख म्हणाले. कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण कोणतंही विधान माध्यमांमध्ये केलेलं नाही. मात्र काही विशिष्ट माध्यमांनी काही विधानं माझ्या तोंडी घातली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. 

जेएनयूमधील हिंसाचाराची घटना अत्यंत दुर्दैवी होती, असं देशमुख म्हणाले. या घटनेच्या निषेधार्थ गेटवे ऑफ इंडियावर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी एका तरुणीच्या हातात फ्री कश्मीर असा फलक असल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता देशमुख यांनी स्पष्ट केलं की त्या तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबानीतून तिचा उद्देश राष्ट्रद्रोहाचा नव्हता असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल, इंटरनेट सेवा सुरळीत नाही. नेत्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. या परिस्थितीतून काश्मीर मुक्त करावं या भूमिकेतून तिनं फ्री काश्मीरचा फलक हाती धरला होता, असं तिचं म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सर्व माहिती घेऊन तिच्यावरील कारवाई संदर्भात फेरविचार केला जाईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

Web Title: cant say anyone urban naxal just because he criticized previous government says home minister anil deshmukh on bhima koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.