Lockdown: चिकन, मटणाची दुकानं शनिवारी आणि रविवारी खुली राहणार का? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 10:47 PM2021-05-01T22:47:16+5:302021-05-01T22:47:33+5:30

तुमच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

Break the Chain Lockdown: Will the chicken and mutton shops be open on Saturdays and Sundays? | Lockdown: चिकन, मटणाची दुकानं शनिवारी आणि रविवारी खुली राहणार का? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Lockdown: चिकन, मटणाची दुकानं शनिवारी आणि रविवारी खुली राहणार का? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

googlenewsNext

मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ठाकरे सरकारने १५ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण पडत असतात. लॉकडाऊन नसलं तरी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे तुमच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

प्रश्न-१  राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांच्या दुकान शनिवारी व रविवारी (वीकेंड ला) उघडे ठेवता येतील का? यासंबंधीच्या मालवाहतुकीवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत का?

उत्तर – होय. चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्याची दुकाने आठवड्याच्या सात ही दिवस उघडे राहू शकतात. नागरिकांसाठी सकाळी ७:०० ते ११:००  पर्यंत उघडे राहू शकतात व त्यानंतर ई-कॉमर्स सेवेच्या माध्यमाने होम डिलिव्हरी करता येईल.  या  कालावधीनंतर जर कोणीही ही सेवा देताना आढळल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. चिकन, मटण,  कोंबड्यांच्या  मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

प्रश्न -२ आंबे विकणारे दुकान सकाळी अकरापर्यंत चालू ठेवल्या जाऊ शकतात का? या वेळेनंतर प्रक्रिया आणि वर्गीकरण, पिकवण्याचे काम करता येईल का?

उत्तर- ग्राहकांना आंबे विक्रीचा काम सकाळी ७:०० ते ११:००  पर्यंत करता येईल. ग्राहकांची फक्त याच वेळेत व्यवसाय करता येईल. त्यानंतर सेवा देताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु श्रेणीकरण, वर्गीकरण व पिकवण्याचे काम यानंतरही चालू ठेवता येईल. सदर आदेशान्वये ११:०० वाजल्यानंतर होम डिलिव्हरी करता येईल किंवा स्थानीय आपत्तीव्यवस्थापन प्रशासनाने दिलेले आदेशांचे पालन करून सदर काम करता येईल. याच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाही.

Web Title: Break the Chain Lockdown: Will the chicken and mutton shops be open on Saturdays and Sundays?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.