बॉलिवूडची संगीत श्रीमंती मराठी चित्रपटातही : अवधूत गुप्ते 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:44 PM2019-09-14T22:44:03+5:302019-09-14T22:44:29+5:30

खरे तर हे मराठी चित्रपट आणि संगीतकारांचे यश आहे, असे सांगत होते..

Bollywood music is in Marathi film : Awdhoot Gupte | बॉलिवूडची संगीत श्रीमंती मराठी चित्रपटातही : अवधूत गुप्ते 

बॉलिवूडची संगीत श्रीमंती मराठी चित्रपटातही : अवधूत गुप्ते 

googlenewsNext
ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा आशा भोसले पुरस्कार गुप्ते यांना प्रदान

- विश्वास मोरे
पिंपरी : नवी संगीतकारांची पिढी ही अपडेट विथ बॉलिवूड आहे. बॉलिवूडच्यासंगीताचा जो साउंड असतो, जी श्रीमंती असते अशी श्रीमंती मराठी चित्रपटसंगीतातही येत आहे. खरे तर हे मराठी चित्रपट आणि संगीतकारांचे यश आहे, असे सांगत होते, प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार गुप्ते यांना शनिवारी प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने गुप्ते यांच्याशी साधलेला संवाद.


संगीत क्षेत्रातील पुरस्काराविषयी आपली भावना काय?
-आशा भोसले हे नाव हृदयाच्या अत्यंत कोपºयापासून तर ते देव्हाºयापर्यंत सर्व ठिकाणी आहे. त्यांची गाणी आमच्यासारख्या तरुण संगीतकार गायकांना शिकवितात. मार्ग दाखवितात. एखादं गाणं कसे समजून घ्यावे, ते कसे गावं याचा अभ्यास करताना, विशेषत: फिल्मी गाणी, प्लेबॅक सिंगिंग कसे करावे. हे किशोरदा आणि आशाताई यांच्याकडून शिकायला मिळते. आज मी कधी स्टुडियोमध्ये गेलो आणि हे गाणं कसं गावं, हे सूचत नसेल तर त्या वेळी मी विचार करतो, हे गाणं आशाताईंसमोर असतं तर त्यांनी कसं गायलं असतं. खरे तर असा विचार केला की त्याचे उत्तर मिळतं. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान आहे. माज्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण आहे. मला कृतार्थ झाल्यासारखे वाटत आहे.
आशातार्इंच्या गाण्याविषयीची एखादी आठवण सांगा?
-पुण्यात काही वर्षांपूर्वी एका सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बॅकस्टेजला मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर त्यांच्याबरोबर गायची त्यांनी मला संधी दिली. मला असे वाटते की, तो माज्या आयुष्यातील पहिला सुवर्ण क्षण होता. पुढे त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा वेळ घालवायला मिळाला. सूर नवा ध्यास नवाच्या वेळी अंतिम सोहळ्याच्यावेळी त्या आल्या होत्या. हे क्षण सुवर्ण क्षण आहेत. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. माज्या यशात आशातार्इंच्या मार्गदर्शनाचा वाटा आहे.
आशाताइंर्चे गाणे कसे आहे?
 -ज्यावेळी संगीतकार गाणे तयार करायला जातो. त्या वेळी क्रमाक्रमाने प्रसंग, गाण्याचे शब्द, त्यानुसार दिलेली चाल, मग शब्दफेकीपासून त्यातून निर्माण होणाºया भावना असा विचार करायचा असतो. ही गोष्ट मला आशाताईंच्या गाण्यातून शिकायला मिळाली. सूर आणि ताल हे गाण्यातील अविभाज्य घटक आहेत. गाणे हे सुरात असायलाच हवे. हे त्यांच्याकडून समजले. परंतु, सुरांच्या आजूबाजूलासुद्धा भावना आणि त्या शब्दफेकीमधून कशा देऊ शकतो. हे त्यांच्या गाण्यातून कायम आपल्याला कळाले आहे. त्यामुळे मी बरीच गाणी अन्य गायकांकडून गाऊन घेत असताना नवीन गायकांना आशातार्इंच्या गाण्यांचा संदर्भ देत असतो. आशाताईंच्या गाण्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यावर संशोधन व्हायला हवे.
मराठी चित्रपट संगीतात कोणता बदल होतोय?
-पंधरा वर्षांपूर्वी वषार्ला जेमतेम २५ मराठी चित्रपट निघायचे. आता आठवड्याला चार चित्रपट म्हणजे, दोनशे चित्रपट वषार्ला निघत आहेत. तर ऐवढ्या चित्रपटांसाठी संगीत देण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे सर्वांच्या वाट्याला काही ना काही चित्रपट येत आहेत. मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. विषयातही आणि संगीतातही वेगळेपण कायम आहे. खरे तर आजचा काळ हा मराठी चित्रपट आणि चित्रपट संगीतासाठी सुवर्णकाळ आहे. संगीताला भाषेचे बंधन नाही, त्यामुळे संगीतकारांनी मराठीबरोबरच हिंदी, उर्दू, तमीळ अशा विविध भाषांमध्ये गाणी करायला हवीत. मराठी चित्रपट संगीतात संपूर्ण आणि चांगले मराठी जपत काम करायला हवे. आजचे संगीतकार चांगले प्रयोग करीत आहेत. ही स्वागातार्ह बाब आहे. खरे तर नवी संगीतकारांची पिढी अपडेटेड विथ बॉलिवूड आहे. आज बॉलिवूडच्या संगीताचा जो साउंड असतो ती श्रीमंती मराठी संगीतातही येत आहे. ही चांगली बाब आहे.


 

Web Title: Bollywood music is in Marathi film : Awdhoot Gupte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.