दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 04:31 PM2019-10-25T16:31:32+5:302019-10-25T16:33:47+5:30

दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.

BJP's extension during danves tenure; in assembly bjp failed Vidhan Sabhe Election 2019 | दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं

दानवेंच्या कार्यकाळात राज्यात भाजपचा विस्तार; विधानसभेला गणितच चुकलं

googlenewsNext

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपने शानदार कामगिरी केली होती. मागील पाच वर्षांत भाजपने राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्थेच्या असो वा विधान परिषदांच्या जांगासाठीची लढत असो सगळीकडे चांगली कामगिरी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असताना विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे दानवेंच्या कामगिरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

केंद्रीयमंत्रीपदात रस नसल्यामुळे दानवे यांची केंद्रातून राज्यात रवानगी करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्याच कार्यकाळात मराठा, ओबीसी आणि दलित मोर्चांचा भडका उडाला होता. त्याच काळात शेतकरी आंदोलन पेटले होते. तर जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही झाल्या होत्या.

या सर्व निवडणुकांत भाजपने शानदार कामगिरी केली होती. अनेक जिल्हा परिषदा, महानगर पालिका, ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. एकंदरीत तळागाळात भाजप पोहोचविण्यासाठी दानवे यांनी केलेलं संघटन भाजपला ग्रामीण महाराष्ट्रात बस्तान बसविण्यासाठी फायदेशीर ठरलं. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळवलेल यशही दानवे यांच्या कार्यकाळातील होतं. लोकसभेनंतर भाजपमध्ये झालेलं इनकमिंक दानवे यांच्या काळातच सुरू झाले होते. त्याचं श्रेय त्यांच नसलं तरी कार्यकाळ त्यांचाच होता याची नोंद घ्यावीच लागेल.

दरम्यान मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीत त्यांनी पक्षाला विधानसभेसाठी पाय रचून दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसआधी भाजपने खांदेपालट करत चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले. तसेच त्यांना जनतेतून निवडणूक लढविण्यास सांगितले. मात्र याच कालावधीत शरद पवारांनी घेतलेला स्टँडमुळ सर्वच गणितं चुकली. शरद पवारांच्या स्टँडचे उत्तर ना चंद्रकांत पाटलांकडे होते ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसने आपलं वैभव टीकून ठेवण्यात यश मिळवले. तर भाजपच्या जागा कमी झाल्या.

एकंदरीत दानवे यांनी तयार केलेल्या खेळपट्टीवर चंद्रकांत पाटलांना योग्य पद्धतीने बॅटींग करायची होती. कारण सर्वकाही आधीच सेट झालेलं होते. मात्र पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या साथीत भाजपच्या जागा वाढविण्यात अपयश आले. यामुळे दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ भाजपसाठी फायद्याचाच होता हे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: BJP's extension during danves tenure; in assembly bjp failed Vidhan Sabhe Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.