घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:24 PM2019-09-26T12:24:14+5:302019-09-26T12:27:28+5:30

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

BJP split before it becomes a solid alliance! Shiv Sena also in the field | घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

Next

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. परंतु, युतीची चर्चा अद्याप अंतिम झाली नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेकांना विधानसभेची तयारी सुरू केली आहे. ही स्थिती शिवसेना आणि भाजप यांच्यात आहे. परंतु, भाजपमधून निवडणूक लढविल्यास हमखास विजय असं समीकरण झाल्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी भाऊगर्दी वाढली आहे. मात्र युतीचं फायनल होण्यापूर्वीच  भाजपमध्ये गटबाजीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.  

2014 विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे यांच्याविरुद्ध लढताना भाजप दुसऱ्या स्थानी होते. तर शिवसेना तिसऱ्या स्थानी फेकल्या गेली होती. त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी मागणी होत आहे. वास्तविक पाहता घनसावंगी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढान यांनी तयारी सुरू केली आहे.

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे  राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

युतीवर बरच काही निर्भर
2014 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाला जागा सोडण्याचा निकष ठरविण्यात आल्याचे समजते. त्यानुसार घनसावंगी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजप-सेनेचे एकगठ्ठा मतं युतीच्या उमेदवाराला मिळतील. त्यातच वंचितच्या उमेदवारावर बरच काही अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत फायदा पुन्हा युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीवर बरच काही अवलंबून असणार आहे.


उमेदवारीसाठी बापू-बापू आमने सामने

भाजपकडून 2014 मध्ये ऐनवेळी विलासबापू खरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दाखल झालेले भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बापू आर्दड यांनीही घनसावंगीतून उमेदवारी मिळविण्यासाठी मजबूत फिल्डींग लावली आहे. एकूणच विलासबापू आणि सुनीलबापू यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. एकाचवेळी दोन्ही नेते बैठकांचे आयोजन करत आहे. त्यामुळे कोणाच्या बैठकीला जावं, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडत आहे. मात्र ही गटबाजी कायम राहणार की, उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंद होईल, हे तर येणारा काळच सांगणार आहे. त्याआधी सर्वांच्या नजरा युती होणार का याकडे लागल्या आहेत.

 

Web Title: BJP split before it becomes a solid alliance! Shiv Sena also in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.