Shiv Sena MP Sanjay Raut: "भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे", संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:44 PM2021-09-08T15:44:49+5:302021-09-08T15:47:55+5:30

Shiv Sena MP Sanjay Raut: महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"BJP should not talk nonsense, it should be clarified whether Belgaum belongs to Maharashtra or not", Sanjay Raut attacks BJP | Shiv Sena MP Sanjay Raut: "भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे", संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल 

Shiv Sena MP Sanjay Raut: "भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच स्पष्ट करावे", संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल 

googlenewsNext

मुंबई : दोन दिवसापूर्वी बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागल्यानंतर याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. 

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, अशा शब्दांत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. "महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे..तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या.", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, संजय राऊत आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये भाजपाला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. ''बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!'', असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला दिले आहे.

मुंबई अभी बाकी है – चंद्रकांत पाटील
सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केले जात आहे की, बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटले होते. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हटले की, ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असे थेट आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. तसेच, बेळगावात भाजपाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: "BJP should not talk nonsense, it should be clarified whether Belgaum belongs to Maharashtra or not", Sanjay Raut attacks BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.