Nitesh Rane Letter: "मुंबईला 26 जुलैची आठवण येईल की काय?"; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:14 PM2022-05-16T12:14:50+5:302022-05-16T12:15:06+5:30

Nitesh Rane Letter: "मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही."

BJP MLA Nitesh Rane's letter to Cm Uddhav Thackeray about rain and pre monsoon preparation of Mumbai | Nitesh Rane Letter: "मुंबईला 26 जुलैची आठवण येईल की काय?"; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Nitesh Rane Letter: "मुंबईला 26 जुलैची आठवण येईल की काय?"; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

मुंबई: हवामान विभागाने यंदा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याची राजधानी मुंबईत पावसामुळे सामान्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. यावरुन भाजप आमदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. यात त्यांनी 26 जुलैच्या परिस्थितीचीही आठवण करुन दिली आहे.

नितेश राणे काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात नितेश राणे म्हणतात की, "पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्यानं प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मूळ समस्येकडेपण लक्ष दिले पाहिजे".

'26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल '
"यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. तुंबणाऱ्या या मुंबईत 386 असे धोक्याची ठिकाणं आहेत ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त मांटुंगा, वडाळा, सायन भागतच यातील 25 फ्लडींग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.''

'आपण काय उपाय योजना केल्या आहेत?'
"पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्सजवळ पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत?, हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे. राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात?", असा टोला राणेंनी लगावलाय.

Web Title: BJP MLA Nitesh Rane's letter to Cm Uddhav Thackeray about rain and pre monsoon preparation of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.