“आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:11 PM2021-09-02T20:11:01+5:302021-09-02T20:14:46+5:30

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला आहे.

BJP MLA Nitesh Rane Target CM Uddhav Thackeray over BJP Corporator joined Shivsena | “आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला

“आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला

Next
ठळक मुद्देआपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर करायचीभाजपा आमदार नितेश राणेंचा शिवसेनेच्या नेत्यांना टोलानितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचा भाजपा नगरसेवकांचा दावा

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष कामी होण्याची चिन्ह नाहीत. नुकतीच नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता झाली. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी जनआशीर्वादच्या माध्यमातून चांगलंच वातावरण निर्माण केले होते. परंतु ही यात्रा संपून काही दिवस उलटले नाहीत तोवर जिल्ह्यातील राणे समर्थक २ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करुन नारायण राणेंना धक्का दिला आहे.

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचं भाजपा नगरसेवकांनी सांगितले. भविष्यात कणकवली मतदारसंघातील अनेकजण शिवसेनेत येतील असा दावाही करण्यात आला आहे.

मात्र भाजपा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे ट्विटमध्ये म्हणतात की, आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा" अशा शब्दात नितेश राणेंनी उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

 ‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक

शिवसेना राणे कुटुंबाशी कसं वागली विसरणार नाही

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर केलेल्या विधानानंतर शिवसैनिकांनी राणेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत आंदोलन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी शिवसेनेला इशारा दिला. नितेश राणे म्हणाले होते की, आपल्या देशाचा अपमान होत असताना भारतीय नागरिक गप्प बसतील का? एका मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव की हिरक महोत्सव विचारावं याविरोधात तो संताप आहे. आमच्या घरावर जी मुलं पाठवली. आम्ही कुणीही नव्हतो तेव्हा ते सगळे घरावर आहे. पण आता ती वैयक्तिक लढाई त्यांनी केली. आमच्या घरात मुलं होतं. उद्या जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला होता.

Web Title: BJP MLA Nitesh Rane Target CM Uddhav Thackeray over BJP Corporator joined Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.