शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:13 PM2021-03-16T14:13:04+5:302021-03-16T14:16:34+5:30

Sachin Vaze: भाजप नेत्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरी पाठवावं, अशी मागणी केली आहे.

bjp leader kirit somaiya demand that sharad pawar must sacke anil deshmukh from thackeray govt | शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी

शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी

Next
ठळक मुद्देमनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यास अनिल देशमुख अपयशीमनसुख हिरेन यांना या प्रकरणात गोवण्याचा डावशरद पवार यांनी आता गृहमंत्र्यांना घरी पाठवावे - भाजप नेत्याची मागणी

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरी पाठवावं, अशी मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. (bjp leader kirit somaiya demand that sharad pawar must sacke anil deshmukh from thackeray govt)

मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी किरीट सोमय्या यांनी संवाद साधला. अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना तात्काळ घरी पाठवावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

ठाकरे सरकारने सचिन वाझेला पाठिशी घातले, NIA मुळे सत्य समोर येईल: रामदास आठवले

मनसुख हिरेन यांना अडकवण्याचा डाव

या प्रकरणात मनसुख हिरेन यांना अडकवण्याचा वाझेंचा डाव होता. सर्व प्रकरणाच्या मागे हिरेन असल्याचे पोलिसांना भासवायचे होते. मात्र, हिरेन यांनी ते मान्य केले नाही. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलीस सर्व पुरावे नष्ट करण्याच्या मागे लागले, असा आरोप सोमय्या यांनी केला.

दोन्हीवेळा राष्ट्रवादीचाच गृहमंत्री

२००४ मध्ये सचिन वाझेंची हकालपट्टी करण्यात आली होती. २००७ मध्ये ते सेवेतून मुक्त झाले. या दोन्हीवेळेस राष्ट्रवादीचाच गृहमंत्री होता. तरीही त्यांना सेवेत घेण्यात आले आणि चांगली पोस्टिंग दिली. वाझेंवर कारवाई करण्यात दिरंगाई केली. मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. शरद पवारांनी एक तर देशमुख यांची हकालपट्टी करावी किंवा या प्रकरणावर भाष्य करावे, अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी बोलताना केली.

दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे  भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी  मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

Web Title: bjp leader kirit somaiya demand that sharad pawar must sacke anil deshmukh from thackeray govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.