'ईडी'च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही; महाजनांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:09 PM2021-03-30T17:09:16+5:302021-03-30T17:10:54+5:30

कोरोनामुक्त झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे.

bjp leader girish mahajan criticised eknath khadse on ed and corona | 'ईडी'च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही; महाजनांचा पलटवार

'ईडी'च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही; महाजनांचा पलटवार

Next
ठळक मुद्देगिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर पलटवार'ईडी'च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो - गिरीश महाजनघरी क्वारंटाइन असल्याचे सांगून मुंबईत फिरत नाही - गिरीश महाजन

जळगाव: जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासूनची भाजपची सत्ता उलथवण्यात शिवसेनेला यश आले. यामागील सूत्रे कशी हलवली, याबाबत एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी सविस्तर सांगितले. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. याच दरम्यान गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त होते. आता कोरोनामुक्त झाल्यानंतर गिरीश महाजन (girish mahajan) यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांना 'ईडी'च्या नोटिसा आणि तारखांमुळे कोरोना होतो. पण माझे तसे नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. (bjp leader girish mahajan criticised eknath khadse on ed and corona)

कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गेल्या दहा दिवसांपासून गिरीश महाजन यांच्यावर उपचार सुरू होते. महाजनांनी नुकत्याच केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतर महाजन यांनी जळगावात येऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायात पाहणी करून आरोग्य यंत्रणा व करोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

“देवेंद्र फडणवीस शब्दाला जगणारे; त्यांच्या शब्दावर माझा विश्वास”: जयंत पाटील 

ईडीमुळे कोरोना होणाऱ्यांत मी नाही

मला एकदाच कोरोना झाला. दहा दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. सोमवारी केलेला माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मला करोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की, लगेच कोरोना होतो. ते खासगी हॉस्पिटलमध्ये जातात किंवा घरीच क्वॉरंटाइन होतात. मुंबईत फिरतात. माझे तसे नाही. मला एकदाच कोरोना झाला. माझ्या पूर्ण कुटुंबाला झाला. आम्ही सर्वांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. खोटी सर्टफिकेट्स जोडून मुंबईतील हॉस्पिटलला जात नाही. घरी क्वारंटाइन सांगून मुंबईत फिरत नाही, असा हल्लाबोल महाजन यांनी केला. तरुण असो की पहेलवान, सर्वांनाच कोरोना होत आहे, असेही महाजन म्हणाले. 

ही जनहित याचिका कशी? मुंबई उच्च न्यायालयाची परमबीर सिंगांना विचारणा

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला करोना खरा आहे की, जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. याचा तपास केला पाहिजे, असे खडसे म्हणाले होते. भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणे, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणे हे होत होते, अशी टीकाही खडसेंनी केली होती.

राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

दरम्यान, राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील स्थिती अतिशय गंभीर आहे. शासनाकडून पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत. कोरोनाबाधित रुग्णांना इथे कुणी विचारायला तयार नाही, बेड्स नाही, व्हेन्टिलेटर नाहीत, ऑक्सिजनची सोय नाही. रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकार याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही, असा निशाणा गिरीश महाजन यांनी केला.

Web Title: bjp leader girish mahajan criticised eknath khadse on ed and corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.