दरेकरांना विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने निष्ठावंतांना डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:44 PM2019-12-17T13:44:06+5:302019-12-17T13:45:11+5:30

मुख्यमंत्रीपद, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद आणि शिवसेनेचे विधान परिषद गटनेतेपद मुंबईच्या वाट्याला गेले आहे.  

BJP giving opposition leader post to Darekar | दरेकरांना विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने निष्ठावंतांना डावलले

दरेकरांना विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने निष्ठावंतांना डावलले

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत जागा मिळाल्या नसल्याने भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावे लागले. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घेऊन सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न फसला. निवडणुकीपूर्वी झालेल्या इनकमिंगचा पक्षाला काहीही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावर  यापुढे  पक्षातील निष्ठावंतांनाच संधी देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. मात्र भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रविण दरेकरांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

शिवसेना ते भाजप व्हाया महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा राजकीय प्रवास करणारे दरेकर 2014 नंतर भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपमध्ये येताच त्यांनी विधान परिषद आपल्या पदरात पाडून घेतली. आता त्याच दरेकरांच्या गळ्यात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद पडले आहे. दरेकर यांच्या निवडीमुळे भाई गिरकर, प्रसाद लाड आणि डॉ. परिणय फुके यांचा पत्ता कट झाला आहे. 

दरम्यान पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी सुरेश धस यांचे नाव विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यांना देखील संधी मिळाली नाही. भाजपकडून पक्षातील निष्ठावंत नेत्यालाच हे पद मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दरेकर यांना संधी देण्यात आली. दरेकर मुंबईतील असून त्यांची नियुक्ती झाल्यामुळे राज्य सरकारमधील महत्त्वाच्या चार पदांपैकी तीन पदे मुंबईला मिळाली आहेत. 

मुख्यमंत्रीपद, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद आणि शिवसेनेचे विधान परिषद गटनेतेपद मुंबईच्या वाट्याला गेले आहे.  
 

Web Title: BJP giving opposition leader post to Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.