Toolkit: “काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक”; भाजपचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:41 PM2021-05-18T17:41:34+5:302021-05-18T17:43:09+5:30

Toolkit: टुलकिटवरून आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे.

bjp atul bhatkhalkar criticized congress over toolkit | Toolkit: “काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक”; भाजपचे टीकास्त्र

Toolkit: “काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक”; भाजपचे टीकास्त्र

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाकभाजपचे टीकास्त्र

मुंबई: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. दुसरीकडे, टुलकिटवरून आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. (bjp atul bhatkhalkar criticized congress over toolkit)

एकीकडे कोरोनाचे संकट देशावर अद्यापही कायम असताना, दुसरीकडे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. संकटातही कॉंग्रेस राजकारण करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. यालाच पुष्टी जोडत राज्यातील भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते, असा दावा अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. 

काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार

भारताचा नंबर १ शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा २००८ पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी करोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?, अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये केली आहे. 

बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार?

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर हे सर्व अवलंबून आहे. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाने चाचणी करावी, यासाठीही पुढाकार घेत असून, कोरोना रुग्णसंख्या किती आहे, यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा, ही बाब अवलंबून असणार आहे. आरोग्य आणि सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. 
 

Web Title: bjp atul bhatkhalkar criticized congress over toolkit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.