“शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 10:49 AM2021-05-08T10:49:03+5:302021-05-08T10:51:15+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

bjp atul bhatkhalkar criticises sharad pawar over letter to cm uddhav thackeray | “शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”

“शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा”

Next
ठळक मुद्देशरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आलाशेतकऱ्यांसाठीही एखाद्या पत्राची अपेक्षा आहेमराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय - अतुल भातखळकर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन राज्यात लावण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा उद्योग, हॉटेल क्षेत्रातील आर्थिक उलाढाल मंदावली आहे. अलीकडेच रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा राजकारण सक्रीय होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. भाजपने यासंदर्भात शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. (bjp atul bhatkhalkar criticises sharad pawar over letter to cm uddhav thackeray)

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही याची झळ बसली असून, यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. 

शेतकऱ्यांसाठीही एखाद्या पत्राची अपेक्षा आहे

शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो, अशी टीका अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. 

सलाम! ५ महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार; चिमुकल्या जीवासाठी १६ कोटींचे महादान

मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय

शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला, तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय, असे भातखळकर यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

लंडनमधील क्वारंटाइन काळात एस. जयशंकर यांना वेटरसारखे कपडे!; भाजप खासदाराचा दावा

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एफएल-३ परवानाधारक हॉटेल-परमिट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपतकालीन पतरेखा हमी योजना क्र. १.० व २.० अंमलात आणून सदर योजनेला दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. ३.० योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग –व्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी, असे शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
 

Web Title: bjp atul bhatkhalkar criticises sharad pawar over letter to cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.