Ashish Shelar : "महाराष्ट्रातले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी शिवसेना दिदींना मदत करतेय का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 02:33 PM2021-12-01T14:33:06+5:302021-12-01T14:46:31+5:30

BJP Ashish Shelar And Shivsena : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भेटीवरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

BJP Ashish Shelar Slams Shivsena Over Mamata Banerjee mumbai visit | Ashish Shelar : "महाराष्ट्रातले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी शिवसेना दिदींना मदत करतेय का?"

Ashish Shelar : "महाराष्ट्रातले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी शिवसेना दिदींना मदत करतेय का?"

Next

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्या. सर्वप्रथम त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना 'जय मराठा, जय बांगला' असा नारा देत सर्वांना आश्चर्यचकीत केले. हा नवा नारा भाजपविरोधी राष्ट्रीय राजकारणातील आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी या भेटीवरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, सरकार या भेटीतील चर्चा का लपवते?" असा सवाल शेलार यांनी केला आहे. तसेच "विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात नाही ना?" असं म्हणतं निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "ममता दीदी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय... पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण... महाराष्ट्रातील उद्योगांना, दीदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का?" असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?"

"म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का? नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली, यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाहीना?" असं म्हणत आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात नाही ना? महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी सरकार या भेटीतील चर्चा का लपवते?" असंही शेलार यांनी म्हटलं आहे. 

"जय मराठा, जय बांगला"

सिद्धीविनायक दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. त्यांच्यासाठी प्रार्थना केली. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. त्यासाठी मी मंदिर समिती, ट्रस्टी आणि पुजारी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानते. मला इथे येऊन बरे वाटले. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते, असे सांगत बॅनर्जी यांनी जय मराठा, जय बांगला हा नारा दिला. सिद्धिविनायक दर्शनानंतर बॅनर्जी यांनी शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली. बुधवारी सायंकाळी ममता बॅनर्जी या मुंबईतील बड्या उद्योजकांना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यातील बंगाल जागतिक व्यापार परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण देणार आहेत.


 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Shivsena Over Mamata Banerjee mumbai visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.