'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले राजकारणात 'रिटर्न'! पुणे पदवीधर संघाच्या निवडणुकीत 'एंट्री'  

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: November 9, 2020 01:30 PM2020-11-09T13:30:02+5:302020-11-09T13:46:47+5:30

राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा, विधानसभा अशी कोणतीही निवडणूक म्हटलं की साताऱ्याचे अभिजित बिचुकले हे एक व्यक्तिमत्व झटकन डोळ्यांसमोर येतं...

'Bigg Boss' fame Abhijit Bichukle 'return's into politics! 'Entry' in graduate elections | 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले राजकारणात 'रिटर्न'! पुणे पदवीधर संघाच्या निवडणुकीत 'एंट्री'  

'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले राजकारणात 'रिटर्न'! पुणे पदवीधर संघाच्या निवडणुकीत 'एंट्री'  

Next
ठळक मुद्देभाजपाकडून पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी जाहीर.. 

पुणे : राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा, विधानसभा अशी कोणतीही निवडणूक म्हटलं की साताऱ्याचे अभिजित बिचुकले हे एक व्यक्तिमत्व झटकन डोळ्यांसमोर येतं..त्यांनी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध लोकसभा आणि वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवण्याची धमक दाखवली आहे. आजपर्यंत बिचुकले यांनी विविध निवडणुका जरी लढवलेल्या असल्या तरी अद्याप एकही निवडणूक त्यांना जिंकता आलेली नाही. परंतु, प्रत्येक निवडणुकीत ते आपल्या 'हटके' प्रचार स्टाईलने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पण ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले ते मराठी 'बिग बॉस'या कार्यक्रमाने. आता हेच अभिजित बिचुकले पुन्हा एका निवडणुकीचे मैदान गाजवण्यासाठी रिंगणात उतरले आहे. 

राज्यात या घडीला पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मनसेने पुणे पदवीधर निवडणुकीसाठी रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर करत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांच्या अगोदर आघाडी घेतली आहे. आता अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एकदा पदवीधर संघाच्या निवडणुकीद्वारे राजकारणात जोरदार एंट्री घेतली असून ते आपले नशीब आजमावणार आहे. 

 या संदर्भात बिचुकले म्हणाले, विविध निवडणुकींना आजपर्यंत सामोरे गेलो आहे. त्यात यश जरी मिळाले नसले तरी मी निराश झालेलो नाही. त्यामुळे 
पुन्हा एकदा नव्या जिद्दीने राजकारणात सक्रिय झालो असून शनिवारी मी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पदवीधर संघाच्या निवडणुकीत मतदारांनी पैसा आणि इतर कोणत्याही आमिषाला बळी न पडता सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करावे. त्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारालाच त्यांनी मतदान केले पाहिजे.

आजपर्यंत मला महाराष्ट्र आणि साताऱ्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. त्याचप्रमाणे माझ्या चाहत्यांचीही मला इथपर्यंतच्या प्रवासात मोठी साथ लाभली आहे. मात्र, राजकारणातील पैसा आणि बलाढ्य सत्तेमुळेच आजतागायत लढवलेल्या निवडणुकीत माझा विजय होऊ शकला नाही. मात्र आता पदवीधर निवडणुकीकडे प्रत्येक मतदाराने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. परिवर्तनाची हीच योग्य वेळ आहे.   

या निवडणुकीत माझ्या प्रचाराचा अजेंडा हा शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य हा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मला एक संधी द्यावी. विधानसभेच्या सभागृहात मतदारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्याचा माझा कायम प्रयत्न असेल, असेही बिचुकले यांनी जाहीर केले आहे. 

भाजपाकडून पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी जाहीर.. 
राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.  भाजपाकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा दिल्लीवरून करण्यात आली आहे. शिरीष बोराळकर हे पंकजा मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे या निमित्ताने पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.


 

Web Title: 'Bigg Boss' fame Abhijit Bichukle 'return's into politics! 'Entry' in graduate elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.