कोरोना विळख्यातील महाराष्ट्राला मोठा दिलासा! अमरावती, यवतमाळ, साताऱ्य़ात नवा स्ट्रेन नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:41 PM2021-02-19T15:41:46+5:302021-02-19T15:42:57+5:30

new corona virus Strain in Maharashtra: जगभरात एकीकडे कोरोनाचा दुसरा, तिसऱा स्ट्रेन धुमाकूळ घालू लागलेला असताना ही बाब राज्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे. 

Big relief to Maharashtra; No new corona strain in Amravati, Yavatmal, Satara : Health Department | कोरोना विळख्यातील महाराष्ट्राला मोठा दिलासा! अमरावती, यवतमाळ, साताऱ्य़ात नवा स्ट्रेन नाही...

कोरोना विळख्यातील महाराष्ट्राला मोठा दिलासा! अमरावती, यवतमाळ, साताऱ्य़ात नवा स्ट्रेन नाही...

Next

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागल्याने नागरिक पुन्हा लॉकडाऊनच्या दहशतीमध्ये आहेत. एकीकडे मास्क न घालता वावरणे अगदी सामान्य माणसांपासून ते पोलीस, राजरकीय नेत्यांपर्यंत सुरु आहे. त्यातच अमरावत, यवतमाळसह साताऱ्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून नवा स्ट्रेन धुमाकूळ घालतोय की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. (Maharashtra: No new case of new COVID-19 strain has been found in Yavatmal, Amaravati and Satara districts.)


यावर आता आरोग्य विभागाने पुन्हा कोरोनाच्या विळख्यात जात असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यात गेल्य़ा काही दिवसांत जे नवीन रुग्ण सापडले त्यांच्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे जगभरात एकीकडे कोरोनाचा दुसरा, तिसऱा स्ट्रेन धुमाकूळ घालू लागलेला असताना ही बाब राज्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे. 


कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या  नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी दिली. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी निर्बंध पुन्हा लादण्यात आले असून काळजी न घेणाऱ्या नागरिकांवर त्वरीत कारवाई, गुन्हे, दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 


राज्यात रुग्णवाढीने चिंता, दिवसभरात ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान
गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस संचारबंदी  लागू केली जाणार आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जमावबंदी असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे काय म्हणालेले...

सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना धोक्यात आणतो आहोत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, असे सांगतानाच नियम  पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. 
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी ठाकरे यांनी अनेक सूचना केल्या.

पुन्हा कडक निर्बंध
- लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार
- उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना होऊ शकतो रद्द
- ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार
- कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल
- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार

Read in English

Web Title: Big relief to Maharashtra; No new corona strain in Amravati, Yavatmal, Satara : Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.