मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 09:58 PM2020-09-07T21:58:55+5:302020-09-07T22:01:20+5:30

आज सायंकाळी उशिराने या नव्या दराबाबतचे आदेश काढण्यात आले असून उद्या, 8 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

Big news! CoronaVirus test became even cheaper; 600 to 800 cuts in new rates | मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर

मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर

Next

मुंबई : कोरोना चाचणीचे दर आणखी स्वस्त करण्यात आले असून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या दरांमध्ये 600 ते 800 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यापुढे कोरोना टेस्टसाठी कमीतकमी 1200 आणि अधिकाधिक 2000 रुपये मोजावे लागणार आहेत. 


कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. यासाठी आधी 2200 रुपये आकारले जात होते. तर कलेक्शन साईटवर म्हमजेच कोव्हीड व्हॅन किंवा कॅम्प आदी ठिकाणी सॅम्पल दिल्यास यासाठी 1200 रुपये आकारले जाणार आहेत. यासाठी आधी 1900 रुपये आकारले जात होते. तर कोरोना सदृष्य रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेतल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत.  
आज सायंकाळी उशिराने या नव्या दराबाबतचे आदेश काढण्यात आले असून उद्या, 8 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. शासन निर्णयानुसार भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनएबीएल मान्यता प्राप्त खाजगी प्रयोगशाळांकडून कोवीड-१९ साठी असलेल्या आरटीपीसीआर तपासणीचे दर निश्चिती करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. यासमितीने तत्कालीन लॉकडाऊन परिस्थितीत मर्यादित साधन उपलब्धता लक्षात घेऊन, खाजगी प्रयोगशाळांशी चर्चा करून, खाजगी प्रयोगशाळानी आरटीपीसीआर तपासणीसाठी आकारावयाच्या दराबाबतचा अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार संदर्भ क्र.२ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीच्या कमाल दराबाबतचे दिनांक १३.०६.२०२० व ०४.०७.२०२० च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेले दर दिनांक ०७.०८.२०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून याच शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित कमाल दर निश्चित करण्यात आले होते. 


मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील औद्योगिक/औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. तसेच परिवहन व्यवस्थाही सुरू झाली आहे. तपासणीसाठी आवश्यक रिएजंट्स, व्हीटीएम किट्स व पीपीई किट्स, एन ९५ मास्क, आरएनए एक्स्ट्रॅक्शन किट GcM पोर्टल वर अत्यंत माफक दरात उपलब्ध झाले आहे. तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने, उपलब्धता वाढली आहे. परिणामी यांच्या किमती कमी झाल्या आहेत. राज्यात आयसीएमआर व एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन, आरटीपीसीआर चाचणीच्या दर कमी होणे आवश्यक होते. सदर बाब लक्षात घेऊन संदर्भ क्र. १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार गठित केलेल्या समितीने दरात सुधारणा करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. या समिती सादर केलेला अहवाल शासनाने स्विकृत केला आहे. त्यानुसार आरटीपीसीआर चावणीचे सुधारित दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या...

तयारीला लागा! SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार

सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा

निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना

दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली

Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी

Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार

Web Title: Big news! CoronaVirus test became even cheaper; 600 to 800 cuts in new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.