Corona Virus: काळजी घ्या! महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन; ब्रिटनपेक्षा घातक असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:00 PM2021-02-24T13:00:09+5:302021-02-24T13:00:57+5:30

CoronaVirus New Strain : जगात पहिल्यांदा ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडला होता. त्यानंतर जपान, दक्षिण ऑफ्रिकेमध्ये हा नवनवीन स्ट्रेन सापडू लागले होते.

Be careful! Two new strains of corona in Maharashtra, Kerala; Possibly more dangerous than Britain | Corona Virus: काळजी घ्या! महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन; ब्रिटनपेक्षा घातक असण्याची शक्यता

Corona Virus: काळजी घ्या! महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन; ब्रिटनपेक्षा घातक असण्याची शक्यता

googlenewsNext

कोरोना व्हायरसची (CoronaVirus ) दुसरी लाट देशात येऊ लागली आहे. अशातच महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन (CoronaVirus New Strain) सापडल्याने खळबळ उडाली आहे. जगात पहिल्यांदा ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडला होता. त्यानंतर जपान, दक्षिण ऑफ्रिकेमध्ये हा नवनवीन स्ट्रेन सापडू लागले होते. आता महाराष्ट्रात आणि केरळमध्ये सापडलेला हा नवीन स्ट्रेन यापेक्षा जास्त खतरनाक असण्याची शक्यता PGIMER चंडीगढ़च्या संचालकांनी व्यक्त केली आहे. (two different CoronaVirus New Strain found in Maharashtra And kerala.)


या संचालकांनी सांगितले की, भारतात सापडलेला हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन युरोपच्या स्ट्रेनपेक्षा जास्त घातक आहे. यामुळे हा स्ट्रेन वेगाने संक्रमन करण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत नवीन कोरोना रुग्णांचा आकडा थोपविण्यासाठी प्रत्येकाने हरतऱ्हेने सावधानी बाळगावी. सध्या चंदीगढच्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाचे 55 रुग्ण आहेत. गेल्या दोन आठवड्यांत हा आकडा वाढला आहे. 


महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील सर्वाधिक नवीन कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. संशोधकांना या दोन राज्यांत कोरोनाचे दोन वेगवेगळे नवीन स्ट्रेन N440K आणि E484Q सापडले आहेत. या दोन्हीमध्ये परस्पर संबंध नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. आयसीएमआरनुसार (ICMR) हे कोरोना स्ट्रेन सध्याच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला कारणीभूत नाहीत. 


नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के पॉल यांनी सांगितल्यानुसार देशात SARS-CoV-2 या युकेच्या स्ट्रेनचे आतापर्यंत 187 लोकांना संक्रमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या  स्ट्रेनमुळे आतापर्यंत सहा लोक सापडले आहेत. ब्राझिलच्या कोरोनापासून एक व्यक्ती संक्रमित आहे. आतापर्यंत 3,500 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. 


SAR4-CoV-2 चे भारतात जे नवीन दोन व्हेरिअंट सापडलेत ते महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगानामध्ये या राज्यांमध्ये होते. या दोन्ही नवीन स्ट्रेनच्या जिनोमवर संशोधन सुरु झाले आहे. देशात सध्या दीड लाखांपेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


महाराष्ट्रात सर्वाधिक...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या गेल्या दहा दिवसांच्या नवीन कोरोना रुग्णांंच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, सर्वाधिक भयावह स्थिती ही महाराष्ट्राची आहे. देशभरात दररोज १० ते १५ हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ५४८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५ हजार २१० रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहे

Web Title: Be careful! Two new strains of corona in Maharashtra, Kerala; Possibly more dangerous than Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.