‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट - रमेश थेटे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:05 AM2021-02-20T02:05:37+5:302021-02-20T02:06:06+5:30

‘The Battle of Bhima Koregaon’ : 'भीमा कोरेगाव हा वर्तमानात प्रचंड वादाचा विषय आहे. एका अर्थाने समाजात दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे, नेमके सत्य काय ते या चित्रपटातून पुढे येईल.'

‘The Battle of Bhima Koregaon’ is not cinema fiction but fact - Ramesh Thete | ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट - रमेश थेटे

‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट - रमेश थेटे

googlenewsNext

नागपूर : इतिहासातील भीमा कोरेगावची लढाई आता रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. सुमारे २०० वर्षापूर्वी १८१८ मध्ये घडलेला हा घटनाक्रम माजी आयएएस अधिकारी रमेश थेटे यांनी ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात मांडला आहे. हा बहुचर्चित हिंदी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज असून, लवकरच प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होणार आहे. हा सिनेमा फिक्शन नाही तर वास्तवातील घटनांचा शोध, अभ्यास करून साकारलेला वास्तववादी सिनेमा असल्याचे रमेश थेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
भीमा कोरेगाव हा वर्तमानात प्रचंड वादाचा विषय आहे. एका अर्थाने समाजात दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे, नेमके सत्य काय ते या चित्रपटातून पुढे येईल. भीमा कोरेगावचा लढा हा कोण्या समाजाविरुद्ध नसून ती आत्मसन्मानाची लढाई होती, हेच या इतिहासाच्या दाखल्यांवरून स्पष्ट होते. हा सिनेमा हीच फॅक्ट सादर करेल. त्यामुळे, दोन समाजातील तेढ दूर होऊन सामाजिक सलोखा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे रमेश थेटे म्हणाले. 
‘तुम्हाला तुमचा इतिहास माहीत नसेल तर तुम्ही इतिहास घडवू शकत नाही’. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली भीमा कोरेगाव स्मारकाला भेट दिली होती, तेव्हा म्हटले होते. तोच धागा पकडून हा चित्रपट बनवला आहे. इतिहास सांगायचा असेल तर आजच्या घडीला चित्रपटाशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. मनोरंजनासोबत सत्य घटनाक्रम आणि प्रबोधन याचा ताळमेळ साधत हा चित्रपट बनवल्याचे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षापासून चित्रपटाची तयारी सुरू होती. मोडी लिपी तज्ज्ञ पुण्याचे अशोक नागरे, दत्ता नलावडे, प्रा. प्रेम हनुवते यांच्यासारख्या अनेक इतिहासकार, संशोधक, या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या ब्रिटिश कॅप्टन स्टॉन्टन याची दैनंदिनी व तत्कालीन नोंदकारांच्या दस्तऐवजांचा आधार घेऊन हा सिनेमा रुपेरी पडद्यावर उतरला आहे. 

संकल्पना, गीत, संगीत, दिग्दर्शन व निर्मिती
रमेश थेटे हे गेले ३५ वर्ष आयएएस अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’च्या कथेची संकल्पना, पाचही गीत, संगीत, गायन, चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती स्वत: थेटे यांनी  केली आहे. रमेश थेटे फिल्म्स अंतर्गत हा बिग बजेट सिनेमा साकारला गेला आहे. विशेष म्हणजे, याचे हेडक्वॉर्टर नागपूर आहे. यात प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याची असून, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री दिगांगणा सूर्यवंशी, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, अभिमन्यू सिंग, मिलिंद गुणाजी, गोविंद नामदेव, यतीन कारेकर आदींच्या भूमिका आहेत.

पुण्यात १७९५ ते १८१८ या काळात अस्पृश्यांवर प्रचंड अत्याचार वाढले होते. राज्यकर्त्यांमध्ये न्याय देण्याची दानत संपली होती. समतेच्या लढाईत लक्ष्य ठरले असेल तर शक्ती पणाला लागते आणि ती संधी १८१८ मध्ये सापडली. त्या असंतोषाची ऊर्जा ज्वालामुखीत रुपांतरित झाली, त्याचे नाव ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ होय. ही लढाई जातीविरुद्ध नव्हती तर वृत्तीविरुद्ध होती, हे महत्त्वाचे.     
- रमेश थेटे : दिग्दर्शक, निर्माता

Web Title: ‘The Battle of Bhima Koregaon’ is not cinema fiction but fact - Ramesh Thete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.