अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये : रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:21 AM2020-01-28T10:21:13+5:302020-01-28T10:24:39+5:30

अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये. त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता, असे रोहित पवार यांनी म्हटलंय.

Ashok Chavan statement should not be taken literally Rohit Pawar | अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये : रोहित पवार

अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये : रोहित पवार

Next

अकोला : काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानानंतर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, असे चव्हाण यांनी म्हटले होते. तर अशोक चव्हाणांचे विधान शब्दश: घेऊ नये. त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता, असे रोहित पवार यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी, संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली असून घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. असं अशोक चव्हाण नांदेड येथील कार्यक्रमात म्हणाले होते.

या संदर्भात रोहित पवार हे पक्षाची भूमिका मांडताना म्हणाले की, महाविकास आघाडी स्थापनेपूर्वीच आमचा समान कार्यक्रम ठरला आहे. नव्हे तर आम्ही एका विचाराने बांधलो आहे. ते शब्द पाळावे लागतात. त्यामुळे अशोक चव्हाण याच उद्देशाने सहज बोलले असतील त्यांचे विधान शब्दश: घेऊ नये, आमचे सरकार एका विचारने गुंफले असून, पाच वर्ष चालणार असे त्यांनी ठामपणे सांगितेले.

Web Title: Ashok Chavan statement should not be taken literally Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.