Ashok Chavan: अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, कॅबिनेट बैठकीतून पडले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 06:42 PM2022-01-27T18:42:44+5:302022-01-27T19:01:09+5:30

Ashok Chavan: अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा ते कॅबिनेट बैठकीला हजर होते. रिपोर्ट कळताच ते मंत्रिमंडळाची बैठक सोडून बाहेर पडले.

Ashok Chavan: Congress leader Ashok Chavan infected with corona for the second time | Ashok Chavan: अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, कॅबिनेट बैठकीतून पडले बाहेर

Ashok Chavan: अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, कॅबिनेट बैठकीतून पडले बाहेर

Next

मुंबई: मागील काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील अनेकांना दुसऱ्यांदा कोरोना झालाय. या यादीत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव आले आहे. चव्हाणांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांचा काेराेना चाचणी अहवाल गुरूवारी सायंकाळी पाॅझिटिव्ह आला. गेली चार दिवस अशाेकराव चव्हाण नांदेडमध्ये हाेते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे भुमिपुजन, उद्घाटन केले. प्रजासत्ताक दिनी ध्वजाराेहण केले, त्यानंतर ते दुपारी मुंबईला रवाना झाले. त्यांना गुरूवारी रात्री गाेवा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पणजी येथे जायचे हाेते. मात्र, अंगात किंचित ताप वाटल्याने त्यांनी काेराेना चाचणी केली.

दरम्यान, ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित हाेते. आपला अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे कळताच ते या बैठकीतून बाहेर पडले. मात्र त्यांना काेणताही त्रास जाणवत नसल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही खबरदारी म्हणून काेराेना चाचणी केली जात आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच काेराेना चाचणी करून घ्यावी, आराेग्याची काळजी घ्यावी व काेराेना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

शरद पवारांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 24 जानेवारीला त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः पवार यांनी दिली. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. शरद पवारांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

राज्यातल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही कोरोनाने शिरकाव केला. त्यात राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित झाले. त्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
 

Web Title: Ashok Chavan: Congress leader Ashok Chavan infected with corona for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app