CoronaVirus News: ...म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?, आशीष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 04:37 PM2020-05-24T16:37:47+5:302020-05-24T16:46:57+5:30

CoronaVirus News: मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..!

Ashish Shelar's criticize against the Chief Minister uddhav thackeray vrd | CoronaVirus News: ...म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?, आशीष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

CoronaVirus News: ...म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?, आशीष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Next
ठळक मुद्देकेज का नाही दिलं, असा प्रश्न काही जण विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, पॅकेजवरून उद्धव ठाकरेंनी भाजपा अन् फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आता भाजपा नेते आशीष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..!

मुंबई- पॅकेज का नाही दिलं, असा प्रश्न काही जण विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही; असं म्हणत पॅकेजवरून उद्धव ठाकरेंनी भाजपा अन् फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आता भाजपा नेते आशीष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..!, आमच्या कोकणी भाषेत याला म्हणतात "म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?, असं सांगत आशीष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करून दाखवा!, असा टोलाही आशीष शेलारांनी लगावला आहे. राजकारण करू नका हे नेमकं कुणाला सांगताय? खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?, ते खासगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का?, काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही.. म्हणे "आम्ही करणार म्हणजे करणारच!" कधी? महाराष्ट्र हेच म्हणततोय साहेब आता तरी करून दाखवा!!, असं म्हणत आशीष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला आहे.

एकदा म्हणता पावसाळ्यापूर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करू...आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार.. एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत.. आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत... मा.महोदय, रोज भाषण, दिशा बदलतंय! आता बोलून नको, करून दाखवा! अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचतगट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर, करदाते यांना काही तरी मदत करावी असे वाटत नाही का?, हॉस्पिटल मध्ये रुग्णांना घेतले जात नाही. रुग्णवाहिका, खाटा नाहीत. निष्पाप जीव जात आहेत. नुसते भाषण नको. आता तरी करून दाखवा!, असं म्हणत आशीष शेलारांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री म्हणाले होते की,  महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत केली, पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली. आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सव्वा ते दीड लाख रुग्ण महाराष्ट्रात असतील, असा अंदाज त्या केंद्रीय पथकानं व्यक्त केला होता. ३३ हजार ७८६ पॉझिटिव्ह रुग्ण हे सध्या महाराष्ट्रात आहेत. सव्वा लाख रुग्णांचा अंदाज असताना राज्यात ३३ हजार रुग्ण आहेत. दुर्दैवानं महाराष्ट्रात आजपर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

हेही वाचा

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

CoronaVirus News : 31 मेनंतर लॉकडाऊन राहणार की उठणार?; उद्धव ठाकरे म्हणतात...

CoronaVirus News : लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

Web Title: Ashish Shelar's criticize against the Chief Minister uddhav thackeray vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.