मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्यास अटक, कोलकात्यात एटीएसच्या पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 05:35 AM2020-09-13T05:35:06+5:302020-09-13T05:35:30+5:30

पलाश बोस १५ पेक्षा जास्त वर्षे दुबईत राहून काही वर्षांपूर्वी कोलकात्याला परतला. तो अभिनेत्री कंगना रनौतचा चाहता आहे, असे अधिका-याने सांगितले.

Arrest of the person who threatened Chief Minister Thackeray, action of ATS squad in Kolkata | मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्यास अटक, कोलकात्यात एटीएसच्या पथकाची कारवाई

मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्यास अटक, कोलकात्यात एटीएसच्या पथकाची कारवाई

Next

मुंबई/कोलकाता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमक्यांचे फोन कॉल्स केल्याचा आरोप असलेल्या पलाश बोस याला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी कोलकात्यात अटक केली. बोसने असेच कॉल्स गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केले होते, असे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी सांगितले.
बोस १५ पेक्षा जास्त वर्षे दुबईत राहून काही वर्षांपूर्वी कोलकात्याला परतला. तो अभिनेत्री कंगना रनौतचा चाहता आहे, असे अधिका-याने सांगितले. बोसने फोन करताना आपण दाऊद इब्राहीम टोळीचा सदस्य असल्याचा दावा केला होता. त्याने धमक्यांचे फोन दुबईतून मिळविलेल्या सिम कार्डवरून केले होते. त्याचे दुबईत काही संबंध आहेत का, हे तपासले जात आहे. त्याच्यावर खा. संजय राऊत यांनाही या महिन्यात गंभीर परिणाम होतील, अशा धमक्या देणारे फोनसाठी इंटरनेट कॉलिंग सर्व्हिसेसचा वापर केल्याचा आरोप आहे.

संरक्षणमंत्र्यांनी केला मारहाणीचा निषेध
नवी दिल्ली : मुख्यमंत्री ठाकरे यांचे व्यंगचित्र झळकविल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मारहाण केलेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली. राजनाथसिंह म्हणाले, हा हल्ला अतिशय अयोग्य व निंदनीय आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था सांभाळू शकत नसतील तर ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मदन शर्मा यांनी केली.

‘राज्यपुरस्कृत दहशत’फडणवीस यांचा आरोप
हा हल्ला म्हणजे राज्यपुरस्कृत दहशत असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटणा येथे दिली. तर हल्लेखोरांना तत्काळ अटक केली आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे. विरोधी पक्षाने या घटनेवरून राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे.

Web Title: Arrest of the person who threatened Chief Minister Thackeray, action of ATS squad in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.