आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना, सोशल मीडियावरून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:15 PM2020-08-21T12:15:10+5:302020-08-21T12:15:48+5:30

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणारे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने गाठले आहे.

Appeal to MLA Rituraj Patil on social media | आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना, सोशल मीडियावरून आवाहन

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना, सोशल मीडियावरून आवाहन

Next
ठळक मुद्देआमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना सोशल मीडियावरून आवाहन

कोल्हापूर : कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणारे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने गाठले आहे.

त्यांनी सोशल मीडियावरून माझी कोविड-१९ चाचणी पॉझीटीव्ह आल्याचे सांगून माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, अशी विनंती केली आहे.एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचं, असं म्हणत ऋतुराज यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केले होते.

 

कोल्हापुरात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांतील आठ हजारांहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र आपणच जास्त बेफिकीरीने वागत आहोत. आजही बाजारपेठ, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी गर्दी होत आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापरही करत नाही, मित्रांसोबत एकत्र गप्पा मारणे, जेवायला एकत्र बसणे, गल्लीच्या कोपऱ्यावर मित्रमंडळी तासन‌्तास गप्पा मारताना दिसतात. ह्यत्याला काय होतंय,ह्ण म्हणत वाढदिवसाला मित्रमंडळी गर्दी करून सेलेब्रेशन करतात.

सुट्टी आहे, वेळ आहे म्हणून पार्ट्या केल्या जातात. कोरोना किती दिवस आहे माहीत नाही, असे म्हणत लग्नाचा मुहूर्त काढून नियमांचे उल्ल्ंघन करून पै-पाहुणे बोलावतात. खेळण्यासाठी आयुष्य आहे; पण आता थोडं थांबू शकत नाही का? अशी विचारणा व्हिडीओच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी केली होती.


माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.
- आमदार ऋतुराज पाटील

 

Web Title: Appeal to MLA Rituraj Patil on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.