Another victim in Mumbai police force | मुंबई पोलीस दलात आणखी एकाचा बळी

मुंबई पोलीस दलात आणखी एकाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला पोलीस ठाण्यातील ४९ वर्षीय अंमलदाराचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात कोरोनामुळे ३० पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. यात मुंबईतील २० हून अधिक पोलिसांचा समावेश आहे.


कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत या अंमलदारावर गेल्या वर्षभरापासून कर्करोगावर उपचार सुरू असल्याने ते रजेवर होते. ते वागळे इस्टेट परिसरात कुटुबियांसोबत राहयाचे. १९ मे रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू झाले. पण उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दुजोरा दिला.


राज्यभरात विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी १ लाख २१ हजार ५६२ गुह्यांची नोंद केली आहे. तर होम क्वॉरंटाइन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७०६ जणांवर कारवाई केली आहे. अवैध वाहतूक प्रकरणी १३३० दाखल गुह्यांत २३ हजार ७०३ जणांना अटक केली आहे.

राज्यभरात १,५२६ पोलिसांवर उपचार
राज्यभरात १,५२६ पोलीस कोरोनावर उपचार घेत आहेत. तर कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ३० वर गेला आहे.
तसेच आतापर्यंत पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी २५८ गुह्यांची नोंद झाली असून, ८३८ जणांवर कारवाई करण्यात आली
आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Another victim in Mumbai police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.