आणखी तीन महिने शिवभोजन पाच रुपयांत; ३ कोटी ८ लाख नागरिकांना फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:00 AM2020-07-03T04:00:34+5:302020-07-03T04:00:52+5:30

शिव भोजन थाळी पाच रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता.मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहि

Another three months of Shiva meal at five rupees; Benefit to 3 crore 8 lakh citizens | आणखी तीन महिने शिवभोजन पाच रुपयांत; ३ कोटी ८ लाख नागरिकांना फायदा 

आणखी तीन महिने शिवभोजन पाच रुपयांत; ३ कोटी ८ लाख नागरिकांना फायदा 

Next

मुंबई : आणखी तीन महिने ५ रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

शिव भोजन थाळी पाच रुपये देण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला होता.मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहिले. केशरी शिधापत्रिका-धारकांना दोन महिने सवलतीत धान्य मे आणि जूनमध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. सदर योजना आणखी दोन महिने चालू राहील, अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या ३ कोटी ८ लाख नागरिकांना या योजनेचा फायदा होत आहे.

Web Title: Another three months of Shiva meal at five rupees; Benefit to 3 crore 8 lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.