अंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द, रथोत्सवही प्रतीकात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 07:34 PM2021-04-05T19:34:32+5:302021-04-05T20:02:24+5:30

CoronaVirus Temles in Kolhapur- कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या निर्बंधांतर्गत कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील सर्व मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. जोतिबाची चैत्र यात्राही रद्द केली असून अंबाबाईचा रथोत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी दिली.

Ambabai temple closed again, Jyotiba Yatra canceled, Rathotsavahi symbolic | अंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द, रथोत्सवही प्रतीकात्मक

अंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द, रथोत्सवही प्रतीकात्मक

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द, रथोत्सवही प्रतीकात्मकपश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या निर्बंधांतर्गत कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील सर्व मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. जोतिबाची चैत्र यात्राही रद्द केली असून अंबाबाईचा रथोत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी दिली.

राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली असून त्यात सर्व जाती-धर्माची मंदिरे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, देवस्थान समितीकडे तसे निर्देश आलेले नसल्याने सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले होते.

सोमवारी दुपारी बैठकीनंतर त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार अंबाबाईसह समितीच्या अखत्यारितील सर्व ३ हजार ६४ मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले तसेच यंदाही २६ तारखेला होणारी जोतिबाची चैत्र यात्राही करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी (दि. २७) अंबाबाईचा रथोत्सवदेखील प्रतीकात्मकरित्या मंदिराच्या आवारात साजरा केला जाईल. सर्व मंदिरांचे सर्व धार्मिक विधी, पूजा, अर्चा नियमित सुरू राहतील. मात्र, पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षकवगळता अन्य कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Ambabai temple closed again, Jyotiba Yatra canceled, Rathotsavahi symbolic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.