देशातील सर्व व्यवस्था जातीयवाद्यांच्या ताब्यात  : एच. डी. देवेगौडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 08:47 PM2019-07-05T20:47:13+5:302019-07-05T20:48:04+5:30

लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.

All the systems in the possession of communalists: H. D. DEVEGOWDA | देशातील सर्व व्यवस्था जातीयवाद्यांच्या ताब्यात  : एच. डी. देवेगौडा

देशातील सर्व व्यवस्था जातीयवाद्यांच्या ताब्यात  : एच. डी. देवेगौडा

Next
ठळक मुद्देधर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन

पुणे : देशातील सर्व व्यवस्था जातीयवादी शक्तींनी ताब्यात घेतल्या आहेत. लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असून त्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन माजी पंतप्रधान व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी केले. कर्नाटकातील जनता दलाचे सरकार सत्तारूढ होताना अशा शक्ती एकत्र येण्याची शक्यता होती, मात्र ते झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जनता दल कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा शुक्रवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, आमदार प्रा. शरद पाटील, पक्षाचे कार्याध्यक्ष व राज्याचे प्रभारी पीजीआर सिंधीया, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष सरिता मानकर, पुणे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, युवक प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे उपस्थित होते.
देवेगौडा म्हणाले, भारतीय जनता पाटी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल हे नेते एकत्र येण्याची चिन्हे होती, मात्र दुदैर्वाने ते साध्य झाले नाही. त्यानंतर आता पुन्हा देशातील स्थिती बिघडली आहे. प्रत्येक यंत्रणेत सरकारी हस्तक्षेप होतो आहे. याचा सगळ्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे.
कोळसे म्हणाले, सरकार त्यांचा छुपा अजेंडा अंमलात आणते आहे. निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी देशस्तरावर आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सडून मरायचे की लढून हे ठरवण्याची वेळ आली आहे. देशातील वयोवृद्ध नेते रस्त्यावर येण्याची भाषा करत असताना युवकांनी घरात बसून राहू नये, आमच्याबरोबर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सिंधिया, गडहिंग्लज नगरपालिकेच्या पक्षाच्या नगराध्यक्ष स्वाती काळे, शेवाळे, शिंदे यांची यावेळी भाषणे झाली. 
...........
साठीच्या पुढील सर्व शेतकºयांना सरकारने दरमहा ५ हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. राज्यात तसेच देशात असलेल्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या सर्व नेत्यांबरोबर, मुळ जनता दलातून बाहेर पडून नवा पक्ष, संघटना स्थापन करणाºयांबरोबर चर्चा करावी. त्यांना देशाची सद्यस्थिती सांगावा व एकत्र येण्याचे महत्व पटवून द्यावे अशी सुचना यावेळी देवेगौडा, कोळसे यांनी कार्यकर्त्यांना केली.

Web Title: All the systems in the possession of communalists: H. D. DEVEGOWDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.