दुष्काळाला सर्वजण मिळून सामोरे जाऊ; शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना साद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 05:29 PM2019-05-25T17:29:48+5:302019-05-25T17:30:16+5:30

शरद पवार यांनी साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली.

All should face drought Sharad Pawar's sadh | दुष्काळाला सर्वजण मिळून सामोरे जाऊ; शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना साद

दुष्काळाला सर्वजण मिळून सामोरे जाऊ; शरद पवारांची दुष्काळग्रस्तांना साद

Next

मुंबई - संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं, असं सांगत माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपण दुष्काळग्रस्तांसोबत असल्याचे म्हटले आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी आणि नागेवाडी गावांना पवार यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. तशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली.

शरद पवार यांनी साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली. संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं, आज सबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आज काळ कठिण आहे. मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रयत्न करू, असं पवार म्हणाले.

पाऊस उशिरा येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, नंतर पाऊस चांगला पडेल असं म्हटले जात आहे. पाऊस चांगला पडो पण आपण त्यासाठी तयार रहायला हवं. पावसाचा थेंब न थेंब वाचवून पाण्याचे योग्य ते नियोजन करायला हवे. पाणी फाऊंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे. त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे सुरूच ठेवलं पाहिजे किंबाहुना आपण हे वाढवलं पाहिजे, असं आवाहन पवारांनी केले.

टँकरची मागणी वाढली आहे. रेशन कार्डवर धान्य मिळत नाही, अशी तक्रार देखील केली जात आहे. चारा छावणीऐवजी गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू. या कठिण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकारकडून मदत घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असंही पवार यांनी म्हटले.

Web Title: All should face drought Sharad Pawar's sadh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.