अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:05 PM2019-11-01T13:05:20+5:302019-11-01T13:16:05+5:30

निवडणुकीचा निकाल लागताच, संजयमामा शिंदे यांनी भाजपची वाट धरली आहे. अपक्ष आमदार शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविणारे पत्र सादर केले. त्यामुळे संजयमामा यांनी राष्ट्रवादीलाच मामा बनवल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

Ajit Pawar's 'he' decision faltered; Sanjayama again with BJP | अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत

अजित पवारांचा 'तो' निर्णय फसला; संजयमामा पुन्हा भाजपसोबत

googlenewsNext

मुंबई - मुळ राष्ट्रवादी, त्यानंतर युती पुन्हा राष्ट्रवादी त्यापाठोपाठ पुन्हा भाजप आणि आता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार झालेल्या संजय मामा शिंदे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला हात दाखव भाजपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संजय शिंदे यांना पाठिंबा देण्याचा अजित पवारांचा निर्णय फसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

करमाळा मतदार संघातून संजयमामा शिंदे यांनी अपक्ष विजय मिळवला. मुळचे राष्ट्रवादीचे नेते असलेले संजयमामा यांनी 2014 मध्ये महायुतीतून स्वाभिमानी पक्षातून निवडणूक लढवली होती. त्या पराभवानंतर ते भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्षही झाले. लोकसभेला ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले आणि माढा मतदार संघातून निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी भाजपशी घरोबा केला. मात्र युती झाल्यानंतर शिंदे यांनी करमाळा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उडी घेतली.  

अपक्ष म्हणून आपला निभाव लागणार नाही,  हे निश्चित होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आवश्यक होता. दुसरीकडे राष्ट्रवादीने करमाळ्यातील आपला उमेदवार जाहीर केला होता. परंतु, अजित पवार यांनी एकांगी निर्णय घेत संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर संजयमामा विजयी झाले. त्यावेळी अजित पवारांवर जाहीर टीका देखील झाली होती.

दरम्यान निवडणुकीचा निकाल लागताच, संजयमामा शिंदे यांनी भाजपची वाट धरली आहे. अपक्ष आमदार शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविणारे पत्र सादर केले. त्यामुळे संजयमामा यांनी राष्ट्रवादीलाच मामा बनवल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

 

Web Title: Ajit Pawar's 'he' decision faltered; Sanjayama again with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.