'प्रमोद महाजनांच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, आता भाजपनं प्रथा मोडली'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 06:03 PM2021-09-20T18:03:54+5:302021-09-20T18:05:20+5:30

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

'After the death of Pramod Mahajan, we did not field a candidate, now BJP has broken the tradition', says balasaheb thorat | 'प्रमोद महाजनांच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, आता भाजपनं प्रथा मोडली'

'प्रमोद महाजनांच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, आता भाजपनं प्रथा मोडली'

Next

मुंबई: भाजपने राज्यसभेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका करत एका जुन्या निर्णयाची आठवण करुन दिली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेली राज्यसभेच्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, प्रमोद महाजन यांचं निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. पण, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. राजकारणात एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे, पण भाजपने ही प्रथा मोडलीये, असं थोरात म्हणाले.

भाजपला विनंती करू
थोरात पुढे म्हणाले की,भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली, हे योग्य नाही. राजकारणात काही संकेत असतात. एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर उमेदवार दिला जात नाही. पण, भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू, असं थोरात म्हणाले. 

Web Title: 'After the death of Pramod Mahajan, we did not field a candidate, now BJP has broken the tradition', says balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.