Address of Manikrao Thackeray; Ranpise and Wajahat Mirza by Congress | माणिकराव ठाकरेंचा पत्ता कट; काँग्रेसतर्फे रणपिसे व वजाहत मिर्झा
माणिकराव ठाकरेंचा पत्ता कट; काँग्रेसतर्फे रणपिसे व वजाहत मिर्झा

मुंबई : विधान परिषदेच्या १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकासाठी काँग्रेसने दोन जागांसाठी शरद रणपिसे व डॉ. वजाहत मिर्झा यांना उमेदवारी दिली. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे व संजय दत्त यांचा त्यामुळे पत्ता कट झाला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे तीन सदस्य निवृत्त होत आहेत.
विधान परिषदेचे उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह पक्षाध्यक्ष प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री उशिरा या दोघांची नावे जाहीर करण्यात आली.
डॉ. मिर्झा हे यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असून, ते माणिकराव ठाकरे यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात. डॉ. मिर्झा हे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे निकटवर्तीय मानले जातात.
शिवसेनेने विद्यमान सदस्य अ‍ॅड. अनिल परब यांच्याबरोबरच पक्ष प्रवक्त्या मनिषा कायंदे यांना उमेदवारी दिली आहे.
मनिषा कायंदे यापूर्वी भाजपामध्ये होत्या. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील मानले जातात.


Web Title:  Address of Manikrao Thackeray; Ranpise and Wajahat Mirza by Congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.