आयटीआयची प्रवेशक्षमता ५० हजारांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:49 AM2019-06-21T02:49:50+5:302019-06-21T07:08:26+5:30

कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री रणजित पाटील यांची विधानपरिषदेत माहिती

The accessibility of the ITI will increase by 50 thousand | आयटीआयची प्रवेशक्षमता ५० हजारांनी वाढणार

आयटीआयची प्रवेशक्षमता ५० हजारांनी वाढणार

Next

मुंबई : राज्यातील आयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजारांनी वाढविणार असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राष्ट्रवादीचे जगन्नाथ शिंदे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात ४१७ शासकीय व ४२५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यातून इयत्ता १०वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन वर्षांचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अशा ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या संस्थामध्ये प्रत्येक वर्षी १ लाख ४० हजार जागा उपलब्ध असतात.

तंत्रनिकेतन (पॉलिटेक्नीक) मध्येही आयटीआयचे कोर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरात आयटीआयच्या प्रवेशासाठी जिथे मागणी असेल तिथे कोर्स सुरु केले जातील. तसेच प्रवेश क्षमता व तुकड्यांची संख्याही वाढविली जाईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. आयआयटीतील अद्ययावत यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासेल तिथे ते देण्यात येईल. कल्याण येथील आयआयटी या वर्षीच्या शैक्षणिक वषार्पासून सुरु करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

Web Title: The accessibility of the ITI will increase by 50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.