अश्लील वर्तन करणारा शिक्षक ताब्यात
By Admin | Updated: January 2, 2016 08:35 IST2016-01-02T08:35:46+5:302016-01-02T08:35:46+5:30
विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थिनींनी हा प्रकार आई-वडिलांना

अश्लील वर्तन करणारा शिक्षक ताब्यात
धारुर (जि. बीड) : विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थिनींनी हा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर धारुर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनंत नामदेव गायकवाड असे या शिक्षकाचे नाव असून, केंद्रेवाडी शाळेत विद्यार्थिनींसोबत तो गेल्या दोन महिन्यांपासून अश्लील वर्तन करायचा. गुरुवारी सकाळी शाळा भरल्यानंतर अनंत गायकवाडने पुन्हा हा प्रकार केला. शाळा सुटल्यानंतर काही मुलींनी घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे त्यांच्या पालकांनी शाळेवर जाऊन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सचिन केंद्रे व माजी सभापती नारायण केंद्रे यांच्याकडे गायकवाडविरुद्धचा रोष व्यक्त केला. त्यानंतर केंद्रे यांनी धारुर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ गायकवाड यास ताब्यात घेतले. तीन मुलींच्या फिर्यादीवरून गायकवाडविरुद्ध धारुर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाललैंगिक अत्याचार कायद्यासह इतर कलमांचा त्यात समावेश आहे.
- तीन मुलींच्या फिर्यादीवरून गायकवाडविरुद्ध धारुर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाललैंगिक अत्याचार कायद्यासह इतर कलमांचा त्यात समावेश आहे.