९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; मार्च महिन्याच्या अखेरीस आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 01:53 PM2021-01-08T13:53:54+5:302021-01-08T13:55:08+5:30

akhil bharatiya marathi sahitya sammelan : हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

94th akhil bhartiya marathi sahitya sammelan will be in nashik, kautikrao thale patil announcement in aurangabad | ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; मार्च महिन्याच्या अखेरीस आयोजन

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार; मार्च महिन्याच्या अखेरीस आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्देअंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे, असे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलननाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिक येथील एकाच संख्येला निमंत्रण पाहणीसाठी निवडले आणि त्याला भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली आणि आपला अहलवाल महामंडळाला दिला, असे  कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.

याचबरोबर, ९४ व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचे एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. मात्र, साहित्य महामंडळाने स्थळनिवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केली आहे, असे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.
 

Web Title: 94th akhil bhartiya marathi sahitya sammelan will be in nashik, kautikrao thale patil announcement in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.