Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:08 AM2021-06-14T10:08:46+5:302021-06-14T10:09:28+5:30

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या.

80% of mangoes exported are from Maharashtra; Another honor in Amrakatha | Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा 

Mango: निर्यात होणारा ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील; आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी ८० टक्के आंबा महाराष्ट्रातील असून, भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या आम्रकथेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. वाय.एन. नेने यांच्या मँगो थ्रू मिलेनिया या शोधनिबंधानुसार उपनिषदे, मौर्यन शिलालेखांमध्ये आंब्याचा उल्लेख आढळतो.

मूळ भारतीय आंब्याचे प्रकार हे मुख्यतः चोखून खाण्यास योग्य, रसाळ व अल्पकाळ ताजे राहणारे असे होते. या आंब्यांना आज रायवळ म्हणजेच रानवळ म्हणजे रानातील आंबे म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आंब्याची जे वाण स्थानिक स्वरूपात होते ती सगळी अस्सल भारतीय होत. याच वाणांचा संकर करून सगळ्या संकरित प्रजाती बनल्या. म्हणूनच आज कोकणात काही ठिकाणी ४००-५०० वर्षे जुनी आंब्याची झाडे सापडतात.

महाराष्ट्रात १५ व्या शतकात पोर्तुगीज अंमल सुरू झाला, तेव्हा स्थानिक वाणांमध्ये प्रयोग केले गेले. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, गोव्यात अनेक संकरित जाती तयार झाल्या. यातील ज्या जाती स्वादिष्ट आणि टिकाऊ म्हणून मायदेशी भेट म्हणून पाठविण्यास योग्य, टेबल फ्रूट म्हणून खाण्यास योग्य होत्या अशा सर्वच जातींना पोर्तुगीज अधिकाऱ्यांची नावे दिली गेली. अल्फोन्सो अल्ब्यूकर्क हा त्यापैकी एक पोर्तुगीज व्हॉइसरॉय होय. त्याच्या नावाने जगप्रसिद्ध झालेला हापूस आंबा भौगोलिक मानांकन प्राप्त व महाराष्ट्राला जागतिक कीर्ती मिळवून देणारा आहे. हा आंबा मुख्यतः रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात आढळतो, असे या शोधनिबंधात नमूद केले आहे.

राज्यात आढळणाऱ्या आम्रजाती
nमानकुराद : रत्नागिरी व सिंधुदुर्गात या प्रकारच्या आंब्याच्या बागा आढळतात. मोसमाच्या मध्यावर हे फळ येते.
nमलगोवा : औरंगाबाद, बीड, परभणी इत्यादी जिल्ह्यांत मलगोवा प्रकारातील आंबा मिळतो. मोसमाच्या शेवटी हे बाजारात बघायला मिळते.
nकेसर : धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांत आढळतो. मोसमाच्या सुरुवातीलाच याचे उत्पन्न येते.
nवनराज : नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य चांगले असते व तो मोसमाच्या मध्यावर मिळतो.
nराजापुरी : हा आंबा औरंगाबाद विभागात मिळतो. वर्षभर याचे पीक येत असते.
nपायरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आढळतो. याचे साठवणूक आयुष्य अतिशय कमी आहे. मोसमाच्या मध्यावर मिळतो.

nसमशीतोष्ण प्रदेशात येणारे आंबा हे फळ महाराष्ट्रात कुठेही पिकते. कोकणात सर्वोत्तम आंब्याच्या जाती आढळतात. यात हापूस, पायरी, मलगोवा, मानकुराद, केसर, राजापुरी, वनराज, तोतापरी या महाराष्ट्रात परंपरागत पिकविल्या जाणाऱ्या आम्रजाती आहेत. तर भारताच्या अन्य राज्यांत जन्माला 
आलेल्या सोनपरी, आम्रपाली, मल्लिका या आंब्याच्या जाती महाराष्ट्रात आढळतात.

Web Title: 80% of mangoes exported are from Maharashtra; Another honor in Amrakatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा