आठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 06:31 PM2018-08-19T18:31:00+5:302018-08-19T18:31:41+5:30

शनिवार- रविवार संपत आला की अनेकांना आठवडाभराची कामे आठवून अनेकांना धडकी भरते.  सोमवारच्या टेन्शनमुळे रविवारी रात्री झोपही लागत नाही.

Start Monday like this, depression will not turn around | आठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही

आठवड्याची अशी सुरुवात कराल तर नैराश्य जवळपासही फिरकणार नाही

Next

 

पुणे : शनिवार- रविवार संपत आला की अनेकांना आठवडाभराची कामे आठवून अनेकांना धडकी भरते.  सोमवारच्या टेन्शनमुळे रविवारी रात्री झोपही लागत नाही. साहजिकच त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होतो. हे सर्व टाळण्यासाठी आठवड्याची सुरुवात फ्रेश व्हावी म्हणून दिलेल्या टिप्स नक्की वापरून बघा. 

रविवारी रात्री पार्टी नकोच : दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्यामुळे रविवारी रात्री शक्यतो पार्टीला जाणं टाळा. अगदीच जायचं असलं तरी लवकरात लवकर घरी येऊन झोप घ्या. पुरेशी झोप आनंदायी दिवसाची सुरुवात असते हे कधीच विसरू नका. 

 

सोमवारची तयारी : सोमवारी कुठले कपडे घालायचे, काय डबा करायचा हा विचार आधीच करा.सकाळी धावपळ, घाई होणार नाही आणि चिडचिडही टाळता येईल. पुरुषांनी सुद्धा गाडी पुसून ठेवणे, बुटांना पॉलीश करून ठेवावी. 

 

लवकर निघा :शहरांमध्ये ट्रॅफिक तर रोजच असते. मात्र आठवड्याच्या सुरुवातीला उशीर झाला आणि बॉसची बोलणी बसली तर अर्थातच मूड जातो. त्यामुळे रोजच्यापेक्षा किमान १५ मिनिटे लवकर निघा. लवकर पोचलात तर आठवड्याचे नियोजन करता येईल. 

 

सोमवार आवडीचा बनवा : घरी आराम करणे किंवा मित्रांसोबत फिरणे सगळ्यांचं आवडत असले तरी कामाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे रविवारी रात्रीच येणाऱ्या सोमवारला शिव्या घालण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा सोमवार आवडीचा बनवा.नवा आठवडा, नवी आव्हाने लक्षात घ्या आणि मागच्या आठवड्यातली टेन्शन संपवून नवी सुरुवात करा. 

 

नवे कपडे घाला : नवे कपडे तर सर्वांना आवडतात. पण नवे कपडे घातल्यावर मूडही छान असतो. त्यामुळे सोमवारी नवे कपडे घाला. नसतील घालायचे तर जुने पण इस्त्री केलेले कपडे आणि त्याला मॅचिंग सगळं घाला. चांगला पोशाख कायम प्रसन्नता आणि आत्मविश्वास देतो. 

Web Title: Start Monday like this, depression will not turn around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.