स्वखर्चातून सोडविला पाणीप्रश्न, नागरिकांची भटकंती थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:51+5:302021-05-13T04:19:51+5:30

देवणी तालुक्यातील वलांडी येथील प्रभाग क्र. ५ मधील बोअरची विद्युत मोटार एक ते दीड महिन्यापूर्वी जळाली होती. त्यामुळे पाणीपुरवठा ...

Water problem solved at one's own expense, wandering of citizens stopped | स्वखर्चातून सोडविला पाणीप्रश्न, नागरिकांची भटकंती थांबली

स्वखर्चातून सोडविला पाणीप्रश्न, नागरिकांची भटकंती थांबली

Next

देवणी तालुक्यातील वलांडी येथील प्रभाग क्र. ५ मधील बोअरची विद्युत मोटार एक ते दीड महिन्यापूर्वी जळाली होती. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने आणि कडक उन्हाळा जाणवत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांंची पाण्यासाठी भटकंती होण्यास सुरुवात झाली. तेव्हा नागरिकांनी वलांडी ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्याकडे ही समस्या मांडली, परंतु निधी नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, येथील नागरिकांनी राहुल सूर्यवंशी यांच्या मध्यस्थीने लिंबन महाराज रेशमे यांच्यासमोर पाण्याचा प्रश्न मांडला असता, तेव्हा रेशमे यांनी स्वखर्चातून येथील मोटार दुरुस्ती करून देऊन पाणीप्रश्न मार्गी लावला. यावेळी राहुल सूर्यवंशी, नरसिंग माने, इस्माईल तांबोळी, आबास शेख, बाळू बनसोडे, विठ्ठल लोंढे, भीमा कोळी, शामराव साळुंखे, किसन बनसोडे, बंडप्पा काकनाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Water problem solved at one's own expense, wandering of citizens stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.