लगतच्या गावांचा हाेणार समावेश...
उदगीर नगरपालिकेच्या हद्दवाढीला शासनाने मान्यता दिली असून, यामध्ये उदगीर शहरालगत असलेल्या मलकापूर, साेमनाथपूर, निडेबन, पिंपरी, मादलापूर येथील काही सर्व्हे नंबरचा समावेश नगरपालिका हद्दीत करण्यात येणार आहे. उदगीर शहराच्या उत्तर भागातील सर्व्हे नंबर ९७ च्या उत्तर, पश्चिम काेपरा ते सर्व्हे नंबर १९३ च्या उत्तर काेपऱ्यापर्यंतचा भाग, पूर्व दिशेला सर्व्हे नंबर १९३ च्या उत्तर पूर्व काेपऱ्यापासून सर्व्हे नंबर २५४ च्या दक्षिण पूर्व काेपरा, दक्षिण दिशेला सर्व्हे नंबर २५४ दक्षिण पूर्व काेपरा ते सर्व्हे नंबर ३३२ च्या पश्चिम दक्षिण काेपऱ्यापर्यंत आणि पश्चिम दिशेला सर्व्हे नंबर ३३३ च्या दक्षिण पश्चिम काेपरा ते सर्व्हे नंबर ९७ उत्तर पश्चिम पर्यंत हद्द वाढ हाेणार आहे. याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसाेडे यांनी दिली.