coronavirus : सुरक्षेची सर्व काळजी घेऊन खाजगी रूग्णालयांनी ओपीडी सुरू ठेवावी;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 01:52 PM2020-03-25T13:52:46+5:302020-03-25T13:53:37+5:30

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आदेश

coronavirus: Private hospitals should continue OPD with all security concerns; collector orders | coronavirus : सुरक्षेची सर्व काळजी घेऊन खाजगी रूग्णालयांनी ओपीडी सुरू ठेवावी;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

coronavirus : सुरक्षेची सर्व काळजी घेऊन खाजगी रूग्णालयांनी ओपीडी सुरू ठेवावी;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next
ठळक मुद्देओपीडी बाबत नियमात शिथिलता

लातूर : खाजगी दवाखान्याची अत्यावश्यक सेवा सुरू आहेच शिवाय ओपीडी सुद्धा संपूर्ण काळजी घेऊन सुरू ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जी श्रीकांत म्हणाले, नियोजित शस्त्रक्रिया, जे जे तातडीचे नाही यासाठी दवाखान्यात गर्दी करून क्रॉस इन्फेक्शन वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. डॉक्टर आपल्यासाठी आहेत. आपण घरीच राहिले पाहिजे. मात्र आजारी असताना, तातडीची गरज ज्यावेळी आहे तेव्हा आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यामुळे ओपीडीबाबत आधीच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे.

Web Title: coronavirus: Private hospitals should continue OPD with all security concerns; collector orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.