coronavirus : लातूरमध्ये निलंग्यातील ६ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 08:43 PM2020-05-18T20:43:47+5:302020-05-18T20:44:12+5:30

लातूर शहरातील बाधिताच्या कुटुंबातील ५ जण निगेटिव्ह

coronavirus: 6 people in Nilanga positive; 5 reports in Latur negative | coronavirus : लातूरमध्ये निलंग्यातील ६ जण पॉझिटिव्ह

coronavirus : लातूरमध्ये निलंग्यातील ६ जण पॉझिटिव्ह

Next

लातूर : जिल्ह्यातील २३ स्वॅब सोमवारी तपासण्यात आले. त्यात परजिल्ह्यातून आलेल्या निलंगा येथील ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित १७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, निलंगा येथे पॉझिटिव्ह आढळलेले ६ जण मुंबई येथून विनापरवाना टेम्पोने गावाकडे आलेले होते. 

निलंगा तालुक्यातील कोराळी येथील ८ जण १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या गावी आले. दरम्यान, गावातील अँटी कोरोना फोर्स व प्रशासनाने त्यांना घरातच थांबून ठेवले. त्यानंतर दुसºया दिवशी त्या सर्वांनाच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्या सर्वांच्याच स्वॅबची तपासणी सोमवारी झाली, ज्यामध्ये ६ जण पॉझिटिव्ह तर दोघे जण निगेटिव्ह आले आहेत. तर ठाणे येथील रुग्णालयातून लातूरला आलेली ५० वर्षीय व्यक्ती बाधित निघाली. ज्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, त्यांच्या परिवारातील ५ जणांची तपासणी करण्यात आली असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले आहेत. तसेच शहरातील अन्य चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण लातूरमध्ये ९ अहवाल निगेटिव्ह, उदगीरमध्ये ३, निलंग्यात २, चाकूर येथील २ व अहमदपूरमधील १ असे एकूण १७ जण निगेटिव्ह असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

Web Title: coronavirus: 6 people in Nilanga positive; 5 reports in Latur negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.