Corona Virus : अंमलबजावणी करणाऱ्यांनीच तोडले नियम; ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 05:00 PM2021-05-11T17:00:01+5:302021-05-11T17:01:22+5:30

Corona Virus : या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालिद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

Corona Virus : Four employees fined Rs 1,000 each for breaking the Corona rules and having alcohol party | Corona Virus : अंमलबजावणी करणाऱ्यांनीच तोडले नियम; ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

Corona Virus : अंमलबजावणी करणाऱ्यांनीच तोडले नियम; ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

googlenewsNext
ठळक मुद्देचार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड आकारण्यात आलातसेच हॉटेल मालकास १० हजारांचा दंड सुनावला आहे.

चाकूर (जि. लातूर) : कोरोनाच्या संकटाच्या काळात नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या चाकूर नगरपंचायतीतील चार कर्मचाऱ्यांनी धाब्यावर ओली पार्टी केली होती. या प्रकरणी त्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजाराचा आणि हॉटेल मालकाला १० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

चाकूर नगरपंचायतीतील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता प्रमोद कास्टेवाड, स्वच्छता निरीक्षक मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, स्वच्छता व घनकचऱ्याचे नियंत्रण शहर प्रमुख सचिन होळंबे यांनी शहरातील एका ढाब्यावर जाऊन ओली पार्टी केली होती. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालिद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितल होते. 
हा अहवाल सादर झाल्याने सदरील चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड आकारण्यात आला, तसेच हॉटेल मालकास १० हजारांचा दंड सुनावला आहे. यापुढील काळात असे गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास निलंबित केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी सांगितले.

Web Title: Corona Virus : Four employees fined Rs 1,000 each for breaking the Corona rules and having alcohol party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.