CoronaVirus : लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ५३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 11:27 PM2020-07-09T23:27:57+5:302020-07-09T23:28:20+5:30

जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख ६०९ वर पोहोचला आहे.

Corona Virus: 53 positive in a single day in Latur district | CoronaVirus : लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ५३ पॉझिटिव्ह

CoronaVirus : लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ५३ पॉझिटिव्ह

Next

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ३९२ पैकी ५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, २७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ४३ अहवाल प्रलंबित असून, २२ अनिर्णित, २ स्वॅब परिपूर्ण नसल्याने रद्द करण्यात आले आहेत. आता जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख ६०९ वर पोहोचला आहे.

गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर तालुक्यात २९, उदगीर ११, अहमदपूर ५, निलंगा ६, औसा २ अशा एकूण ५३ जणांचा समावेश असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

Web Title: Corona Virus: 53 positive in a single day in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.