Central Reserve force's Gypsy hits private bus; Killed one soldier | केंद्रीय राखीव दलाच्या जिप्सीला खाजगी बसची धडक; एक जवान ठार
केंद्रीय राखीव दलाच्या जिप्सीला खाजगी बसची धडक; एक जवान ठार

चाकूर ( लातूर ) : सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातील जवान फायरिंगसाठी चाकूर येथील सीमा दल प्रशिक्षण केंद्राकडे येत असताना जिप्सी आणि खाजगी बसमध्ये भीषण अपघात झाला. यात एक जवान ठार झाला असून  अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. ही घटना तालुक्यातील आष्टामोड येथे बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

लातूर येथील सीआरपीएफ केंद्रातील जवान चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात फायरिंगचा सराव करण्यासाठी जिप्सीमधून (के. एल. २२ बी ८३८७ ) येत होते. आष्टामोड जवळील रेल्वे स्थानकाच्या समोरील वळण रस्त्यावर एका खाजगी बसची  ( एम. एच. ३८ एफ ५३३३ ) समोरासमोर धडक झाली. यात जिप्सी चालक जितेंद्र चौधरी यांचा मृत्यु झाला.  सहाय्यक कमाडंट गंभीरसिंग आणि जवान देशमुख हे गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाची रुग्णवाहिका व दोन डाॅक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लातूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


Web Title: Central Reserve force's Gypsy hits private bus; Killed one soldier
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.